क्राइम

ती होती भोळी , बलात्कार करून त्याने तिला दिली गर्भपाताची गोळी 

Spread the love

विधार्थिनींची तब्येत बिघडल्यावर समोर आले शिक्षकाचे कृत्य 

शहापुरा / नवप्रहार मीडिया

               अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्यानंतर शिक्षकाने तिला गर्भपाताची गोळी दिली. यानंतर तो तिच्यावर नियमित अत्याचार करत होता. पण गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यावर तिला रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे तिला युग्मलयात भरती करण्यात आले. आणि या गोष्टीचा खुलासा झाला.मुलीचे वय 13 वर्ष आहे. पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून शिक्षकाचा शोध घेणे सुरू केले आहे.

राजस्थान च्या शहापूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने सहा महिन्यांपूर्वी आपल्या एका विद्यार्थिनीवर तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर तो तिच्यावर बलात्कार करत होता. ही विद्यार्थिनी 13 वर्षांची आहे. आपला गुन्हा उघडकीला येऊ नये म्हणून तिला गर्भपाताच्या गोळ्याही त्याने दिल्या होत्या. त्यामुळे तिला रक्तस्राव सुरू झाला. तिची प्रकृती बिघडल्याने, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

गेल्या 6 महिन्यांपासून आरोपी तिला अश्लील व्हिडीओ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार करत होता. या बलात्कारामुळे पीडिता गर्भवती राहिली आणि तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिची प्रकृती बिघडली. हा प्रकार उघड झाल्यानंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे. सागर तेली (24) असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close