क्राइम

त्याने मित्राला समजावले पण प्रेमात वेडा तो समजण्यास तयार नव्हता शेवटी…..

Spread the love

त्याने मित्राला समजावले पण प्रेमात वेडा तो समजण्यास तयार नव्हता शेवटी…..

गोदिया  /नवप्रहार मीडिया 

                प्रेमात माणूस आंधळा होऊन बसतो असे म्हणतात. त्याला खाण्या -पिण्याचे , कामाचे भान राहत नाही असे म्हणतात. यावेळी त्याला कोणी समजावले किंवा योग्य सल्ला दिला तरी त्याला तो चुकीचा वाटतो. प्रज्वलंच्या बाबतीतही तसेच घडले. त्याला प्रेयसीच्या भावाने बहिणी पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. पण प्रेमात वेडा झालेल्या प्रज्वल ने त्या धमकी वजा सल्ल्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही. इथेच त्याने चूक केली आणि जीव गमावून बसला.

                  पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार प्रज्वल अनिल मेश्राम आणि संकेत बोरकर चांगले मित्र होते. संकेत ची बहिण आणि प्रज्वल चे सुत जुळले त्यांचे मोबाईल वर बोलणे सुरू झाले. ही बाब संकेत क्या लक्षात आल्यावर त्याने प्रज्वल ल समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर देखील प्रज्वल आणि संकेत क्या बहिणीचे मोबाईल वर बोलणे सुरूच होते.

                 आज पुन्हा संकेत त्याचा मित्र आदर्श भगत याला घेऊन डॉ. आंबेडकर चौक, गोंडीटोला रोड, कुडवा येथे राहत असलेल्या प्रज्वल च्या घरी गेला आणि त्याला बाहेर बोलावून समजावण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. पाहता पाहता हा वाद विकोपाला गेला. आणि संकेत ने जवळ असलेल्या चाकूने प्रज्वल वर वार करून जखमी केले.त्यात प्रज्वल चां मृत्यू झाला.

भावाने आपल्या मित्राला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने भावाने मित्राचा खून केला. ही घटना शहरातील डॉ. आंबेडकर चौक, गोंडीटोला रोड, कुडवा येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. एका प्रेम प्रकरणाच्या या रक्तरंजित अंताची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.पोलिसांनी याप्रकरणी आरोपी संकेत बोरकर (२०) व आदर्श भगत (२०) या दोघांना ताब्यात घेतले.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close