क्राइम

त्याने एक दोन नव्हे तर 30 मुलांची केली हत्या 

Spread the love

सायको किलर ला न्यायालयाने आरोपी म्हणून केले घोषित 

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                    रात्री 12 नंतर तो लहान मुलांच्या शोधात निघायचा. 6 ते 12 वयोगटातील मुले त्याची शिकार असायचे. आई बाबा शेजारी झोपलेल्या या मुलांना तो उचलून न्यायचा. त्यांना आपल्या वासनेचा शिकार बनवायचा आणि त्यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या करून मृतदेह फेकून द्यायचा. पोलिसांनी उत्तरप्रदेश चा रहिवासी असलेल्या रवींद्र कुमार या सिरीयल किलर ला 2015 मध्ये अटक केली होती. न्यायालयाने त्याला आरोपी घोषित केले आहे.

2008 ते 2015 दरम्यान आरोपी रविंद्र कुमारने तब्बल 30 मुलांना आपल्या वासनेचं शिकार बनवलं आणि त्यानंतर त्यांची हत्या केली. 6 वर्षांच्या मुलाचं अपहरण, बलात्कार आणि हत्येप्रकरणी रविंद्र कुमारला अटक करण्यात आली आणि त्यानंतर चौकशीत त्याने एकेक गुन्ह्यांची कबूली दिली. आरोपी रविंद्र कुमारला 2015 मध्ये पोलिसांनी दिल्लीत (Delhi Police) अटक केली होती.

2008 मध्ये रवींद्र कुमार कामाच्या शोधात दिल्लीत आला. त्यावेळी त्याचं वय 18 वर्ष होतं. रवींद्र कुमार मुळचा उत्तरप्रदेशमधल्या  कासगंजचा. रवींद्रचे वडिल प्लम्बरचा काम करत असंत तर आई लोकांच्या घरी धुणीभांडी करत असे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रवींद्र कुमार कामासाठी दिल्लीत आला. इथे त्याला अंमलीपदार्थांचं व्यसन लागलं. याच दरम्यान त्याने पॉर्न फिल्म पाहिल्या होत्या.

रविंद्र कुमार दिवसा मजूरी करायचा आणि संध्याकाळ होतात तो नशेच्या अधीन जायचा. रात्री आपल्या झोपडीत झोपायचा पण मध्यरात्र होताच त्याच्यातला राक्षस जागा व्हायचा आणि तो झोपडीतून बाहेर पडून लहान मुलांच्या शोधान निघायचा. रवींद्रचं टार्गेट ठरलेलं असायचं 6 ते 12 वर्षांदरम्यानच्या मुलांना तो आपली शिकार बनवायचा. यासाठी तो बांधकाम इमारतीच्या आसपास असलेल्या मजूरांच्या झोपड्यांजवळ फिरायचा. तिथे झोपलेल्या लहान मुलांना तो गुपचूप उचलून न्यायाचा. मुलं थोडी मोठी असतील तर त्यांना चॉकलेटचं आमिष दाखवून सुमसाम जागेत घेऊन जायचा.

2014 मध्ये रवींद्र कुमारला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. 6 वर्षांच्या मुलाचं अपहरण करुन त्याचं शारिरीक शोषण करत त्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. मुलाला त्याने सेप्टिक टँकमध्ये फेकून दिलं होतं. त्यानंतर 2015 मध्ये 6 वर्षांच्याच एका मुलीच्या हत्येप्रकरणात पोलीस तपास करत होते. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर रविंद्र कुमारला दिल्लीतील रोहिणी इथून अटक केली. आरोपीने त्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्या मुलीचा गळा चिरून तिची हत्या केली होती.

2008 मध्ये रविंद्रकुमारने पहिला गुन्हा केला. एका लहान मुलीची हत्या करुन तिच्यावर बलात्कार करत तिच्या हत्या केली. यात तो पकडला गेला नाही, त्यामुळे त्याची हिम्मत वाढली. दिल्ली एनसीआर आणि आसपासच्या परिसरात मुलांचा शोध सुरु केला आणि एकटी मुलं दिसताच तो त्यांचं अपहरण करु लागला. मुलांवर बलात्कार केल्यानंतर आपली ओळख सांगू नयेत यासाठी तो मुलांची हत्या करत असे. एका जागी गुन्हा केल्यानंतर तो पुन्हा त्या भागात जात नसे.

रविंद्र कुमाने काही पॉर्न हॉरर फिल्म पाहिल्या होत्या. त्यात बलात्कार केल्यानंतर हत्या करण्यात आल्याचं त्याने पाहिलं होतं. आपणही असंच करायचं असं त्याने ठरवलं. नशा केल्यानंतर तो गुन्हे करु लागला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close