क्राइम

त्याने आपल्या पत्नी सोबत केले त्यानंतर 42 महिलां सोबतही तेच केले

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क 

              पहिले त्याने आपल्या बायको सोबत केले. त्यानंतर त्याने 42 महिलां सोबतही तेच केले. त्याचे ते कृत्य ऐकून पोलिसांना धक्का बसला. या प्रकरणाचा तपास करत असलेला तपास अधिकारी तर सोडा ज्याने हे ऐकले तो काही क्षणांसाठी निशब्द झाला. चला तर जाणून घेऊ या काय  आहे प्रकरण

या व्यक्तीने आधी आपल्या पत्नीची हत्या केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नंतर तो इतका वेडा झाला की त्याने इतर सर्व महिलांनाही त्याच पद्धतीने मारले. पोलीस त्याचा तळ गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे.

सीएनएनच्या वृत्तानुसार, केनियाचे गुन्हे अन्वेषण संचालक मोहम्मद अमीन यांनी सांगितले की, 33 वर्षीय कॉलिन्स जुमासी खालुशा हा महिलांना फूस लावायचा आणि नंतर त्यांची हत्या करायचा. त्याला पहाटे ३ वाजता एका क्लबबाहेर अटक करण्यात आली जिथे तो युरो 2024 फुटबॉल फायनल पाहण्यासाठी गेला होता.

अमीन म्हणाले, चौकशी केली असता त्याने सर्व खुनाची कबुली दिली. हत्येनंतर तो मृतदेह डम्पिंग साईटवर फेकत असे. मात्र, आतापर्यंत केवळ 9 मृतदेह सापडले आहेत. मृतदेह “खराब विकृत आणि कुजलेले होते. काहींचे तुकडे करून, गोण्यांमध्ये घालून फेकून दिले होते.

अमीन म्हणाले, तो सीरियल किलर भाड्याच्या घरात राहतो. जेव्हा आम्ही त्याला त्याच्या खोलीत नेले तेव्हा आम्हाला एक चाकू, 12 नायलॉन बॅग, 2 रबरी हातमोजे, एक हार्ड ड्राइव्ह आणि आठ स्मार्टफोन सापडले. खालुशाने सांगितले की, त्याने पहिली हत्या आपल्या पत्नीची केली होती.

त्यांने बायकोचा गळा दाबून खून केला, त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले, गोण्यांमध्ये भरुन त्याला टाकले. नंतर त्याला कळलं की असं करुन आपल्याला आनंद मिळत आहे, ज्यानंतर त्याने महिलांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.

जोसेफिन मुलोंगो ओविनो नावाच्या महिलेचीही त्याने याच पद्धतीने हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु त्याचा मोबाईल सापडला, त्याचे फॉरेन्सिक विश्लेषण केले असता त्याच्या मोबाईलमधून काही रक्कम हस्तांतरित झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे घेऊन त्याने महिलांची हत्या केली असण्याची शक्यता आहे. राजधानी नैरोबी येथील एका खाणीत सहा मृतदेह सापडले आहेत.

ही एक डंपिंग साइट होती, जिथे लोक कचरा टाकत असत. सध्या ते पाण्याने भरले होते. तिथेच ही व्यक्ती बॉडी टाकत होता. आता प्रश्न असा आहे की ही व्यक्ती दोन वर्षांपासून मृतदेह आणून येथे फेकत होती, पण पोलिसांना काहीच सुगावा लागला नाही. आश्चर्य म्हणजे हे ठिकाण पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close