सामाजिक

त्याला कल्पना नव्हती की मृत्यू दबक्या पावलांनी त्याच्या कडे येतोय 

Spread the love
उत्तरकाशी ( उत्तराखंड)/ नवप्रहार डेस्क
                  मृत्यू हे अटळ सत्य आहे. मृत्यू कधीही आणि कुठेही येऊ शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे. त्याला याची पुसटशीही कल्पना  नव्हती की मृत्यू त्याच्याकडे दबक्या पावलांनी येतोय. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे प्रकरण .
                      जन्म आणि मृत्यू हा परमेश्वराच्या हाती आहे याची प्रचिती आणणारी घटना उत्तराखंड च्या उत्तरकाशी जिल्ह्यात घडली आहे. ऋषिकेश-यमुनोत्री राष्ट्रीय राजमार्गावरून आपली दुकान उघडण्यासाठी जात असताना रस्त्यात त्याला दगड पडलेले दिसले. समाजसेवा आणि इतरांना त्रासापासून वाचविण्यासाठी त्याने रस्त्यावरील दगड बाजूला सारण्याचा निर्णय घेतला. आणि तो आपल्या वाहनातून उतरून दगड बाजूला करत होता.
                इतक्यात डोंगरावरून पडणारा एक दगड येऊन त्याच्या डोक्यात लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला मृत घोषित केले. विजयपाल पंवार (60) असे त्याचे नाव आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close