क्राइम

त्याने बायकोला रिल्स बनवण्यास केला विरोध बायकोने बनवली त्याची पिक्चर

Spread the love
बेगूसराय / नवप्रहार मीडिया
              बिहार राज्यातील बेगूसराय जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका नवऱ्याने आपल्या बायकोला रील बनवण्यास मनाई केल्याने संतापलेल्या बायकोने आपल्या प्रेमी आणि बहिणींसह मिळून नवऱ्याची हत्या केली आहे.
         पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार राणी आणि महेश्वर कुमार राय यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्ना नंतर काही वर्षे ते सोबत राहिले. पण त्यांनतर महेश्वर कुमार कामासाठी कोलकत्ता येथे निघून गेला. त्यामुळे राणी माहेरी येऊन राहू लागली.  इकडे राणी चे अन्य युवकासोबत प्रेमप्रकरण सुरू झाले. राणी ला रील बनवण्याचा नाद जडल्याने तिची ओळख अन्य तरुणांसोबत झाली. महेश्वर लंय गोष्टी आवडत नव्हत्या. तो राणी ला या बद्दल मनाई करत होता.

घटनेच्या दिवशी महेश्वर राणी ची भेट घेण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. दोघांचा रिल्स बनवण्यावरून वाद झाला. राणी ने आपल्या प्रेमी आणि दोन बहिणींसोबत मिळून त्याचा खून केला. दरम्यान महेश्वर चा भाऊ रुदल याने महेश्वर च्या मोबाईल वर कॉल केला असता कॉल अन्य कोणी उचलला. त्यामुळे त्याला संशय आला. त्याने आपल्या वडिलांना महेश्वर च्या सासुरवाडीत जायला सांगितले. महेश्वर चे वडील जेव्हा महेश्वर च्या सासुरवाडीत पोहचले तेव्हा त्यांना महेश्वर चा मृतदेह आढळला.

               महेश्वर च्या कुटुंबीयांनी राणी आणि तिचा प्रेमी आणि तिच्या दोन बहिणींविरोधात त्यांनीच महेश्वर ची हत्या केल्याचा आरोप केला आहे. महेश्वर चा जीव घेण्यासाठी राणी आणि इतरांनी षडयंत्र रचल्याचा त्यांचा आरोप आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close