दिवंगत गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले सांत्वन
पुणे / प्रतिनिधी
भाजपाचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या पुण्यातील निवासस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देत श्रद्धांजली अपर्ण केली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
गिरीश बापट यांच्या जाण्याने भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता व मार्गदर्शक हरपला असून ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या निधनाने भाजपाचे राज्यभरातील कार्यकर्ते शोकाकुल आहेत, अशी शोकसंवेदना श्री बावनकुळे यांनी व्यक्त केली. बापट यांनी भाजपाच्या विस्तारात दिलेले योगदान अमूल्य असून कार्यकर्त्यांच्या मनात ते जिवंत आहेत. त्यांच्या पश्चात भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता बापट कुटुंबीयांच्या पाठिशी उभा असल्याचे सांगून कुटुंबीयांना धीर दिला.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी देखील कुटुंबीयांचे सांत्वन केले व श्रद्धांजली अपर्ण केली.