शेती विषयक

वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान 

Spread the love
वनविभागाकडून बंदोबस्त आणि मदतीची मागणी 
चांदुर रेल्वे / अमोल ठाकरे
                  आधीच नापिकी त्यात वन्य प्राण्यांनी शेतात केलेल्या नासधूसी मुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वन विभगा ने यावर काही उपाय योजना करावी आणि झालेल्या नुकसानीचा मोबदला द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
                  उपलब्ध माहिती नुसार तालुक्यात निमगव्हान येथे तुळशीदास मारोतराव भुते यांचे गत न १५९ क्रं चे शेत आहे. त्यात त्यांनी २ एकर कपाशीची लागवड केली आहे. पीक ऐन जोमात असताना जंगली प्राण्यांकडून पिकाची नासधूस करण्यात येत आहे. या दोन एकर कपाशी पैकी १ एकर कपाशी जंगली प्राण्यांनी पूर्णतः पाडून टाकली आहे.
            एकीकडे शेतकरी निसर्गाच्या लहरी पानाचा मुकाबला करत आहे.  तो पिकाच्या संगोपणावर दिवसरात्र मेहनत घेत आहे. कसे बसे करून या पिकाच्या संगोपनासाठी उधार पाधार घेऊन त्यावर खर्च करत आहे. आणि आता तोंडावर आलेले पीक वन्य प्राणी नष्ट करत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close