पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा असा काढला काटा
पती पत्नीचे नाते हे विश्वासावर अवलंबून असते. यातील एकाने जरी विश्वासघात केला तरी पती पत्नी दरम्यान असलेले नाते तुटायला फार वेळ लागत नाही. नितीन सोबतही असेच झाले. पत्नी प्रियंका आणि दोन मुलांचा खर्च भागवण्यासाठी गुजरातला सुरक्षा रक्षक म्हणून गेला होता. पती तिकडे कुटुंबाच्या भल्यासाठी जीवाचे रान काढत होता तर इकडे पत्नीने पती नसल्याचा गैरफायदा घेत अनस सोबत प्रेम सुरू केले. पती नसल्याचा फायदा घेत प्रियंका ने अनओबात शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
काही काळाने नितीन गुजरात वरून परतंल्याने अनस आणि प्रियंका यांच्या भेटीगाठीत अडचण उत्पन होऊ लागली. मग दोघांनी नितीन ला संपवण्याचा निर्णय घेतला.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी प्रियंका आणि तिचा प्रियकर अनस याला अटक केली आहे. माझा नवरा गुजरातला होता. तोपर्यंत सर्व अलबेल होतं. मला काही अडचण नव्हती. पण नवरा आल्यानंतर प्रियकराला भेटणं शक्य नसल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केलीय, अशी धक्कादायक कबुली प्रियंकाने दिली आहे.
असा रचला कट –
या महिलेने तिचा पती नितीन पांडे याला तिचा प्रियकर अनसशी झगडा करण्याच्या बहान्याने घराबाहेर पाठवलं. त्यामुळे नितीनही अनसशी भांडायच्या इराद्याने तावातावाने बाहेर पडला. तिकडे अनस दबा धरून बसलेलाच होता. नितीन येताच त्याने संधी साधून नितीनवर हल्ला चढवला. नितीनवर चाकूने वार करून त्याला ठार केले. त्यानंतर त्याचा मृतदेह फेकून पसार झाला. नितीन हा सुरक्षा रक्षक म्हणून गुजरातला काम करतो. त्याला दोन मुले आहेत.
अशी आली घटना उघडकीस –
रविवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. त्याचा रक्तबंबाळ मृतदेह नौबस्ता बंबाच्या तीसरी पुलिया येथील गर्द झाडीत सापडला. या घटनेची माहिती तत्काळ नितीनच्या कुटुंबीयांना देण्यात आली. पण त्याच्या कुटुंबीयांनी नितीनची पत्नी प्रियंका आणि तिचा प्रियकर अनसवर खूनाचा आरोप केला होता.
अन् पोपटासारखी बोलू लागली
कुटुंबातील लोकांनी या दोघांविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी प्रियंकाचे फोन सर्व्हिलान्सवर लावले. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच प्रियंका पोपटासारखी बोलू लागली. तिने गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. आणि तिच्या प्रियकराच्याही मुसक्या आवळल्या.