हर हर शंभू च्या गीतांनी भंडारा वासियांचे मन मोहले
अभिलीप्सा पंडा च्या गीतांनी श्री राम जन्मोत्सवाचा शुभारंभ
भंडारा : श्री राम जन्मोत्सव चे अवचीत्य साधत आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे प्रायोजित विविध आयोजनाची सुरुवात शनिवारी सायंकाळी करण्यात आली. यात प्रथम दिनी आलेल्या हर हर शंभू फेम अभिलीप्सा पंडाच्या गीतांनी भंडारा वासियांचे मन मोहून घेतले आणि या गाण्यावर ताल बद्ध होण्यास स्वतः आमदार भोंडेकर यांना सुध्द बाध्य केले. माधव नगर च्या रेल्वे प्रांगणात पाच दिवस भव्य दिव्या असा चालणाऱ्या या आयोजनाची सुरुवात अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
वरील कार्यक्रमाचे अवचीत्य साधत श्री राम जन्मोत्सव समिती द्वारा विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्यांचे सत्कार करण्यात येत आहे. आयोजन च्या प्रथम दिवशी नगर परिषदेतिल सफाई कामगार व वाक्सिनेषण करणाऱ्या कर्मचार्यांना स्मृतीचिन्ह आणि पुष्प गुच्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणू आ. नरेंद्र भोंडेकर, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी, न.प. मुख्याधिकारी विनोद जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने, जैकी रावलानी उपस्थित होते. या नंतर भंडारा वासियान करिता अविस्मरणीय राहणाऱ्या या कार्यक्रमाचा आरंभ शिव विवाह प्रसंगाने करण्यात आली. यावेळी निघणार्या प्रभू शंकराच्या मिरवणुकीत श्रोत्यांनी वरती म्हणून उत्स्फूर्तपणे नृत्य केले. सोबतच कलाकारांनी प्रस्तुत केलेल्या वरमाला प्रसंगाने सर्वांची मने जिंकली. शिव विवाहानंतर, गायिका अभिलिप्सा पंडा यांच्या ग्रुपने देवा श्रीगणेशाच्या संगीताने भक्तिगीतांच्या संध्येला सुरुवात केली. प्रेक्षकांच्या मागणीनुसार भंडारवासी झूम उठे हर हर शंभू या गाण्यावर पुन्हा एकदा या परफॉर्मन्सची पुनरावृत्ती झाली. एकापाठोपाठ एक महादेवाच्या सादरीकरणावर असे वातावरण निर्माण झाले की लोक अभिलीप्साच्या आवाजात आपला आवाज मिसळू लागले. भगवान श्रीरामाच्या इच्छेने असे कलाकार भंडारा शहरात येऊ शकले, असे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि जॅकी रावलानी यांनी सांगितले. अभिलीप्सा पंडा यांनी एकापेक्षा एक महाकाल आणि श्री राम गीते सादर केली, जसजशी संध्याकाळ होत गेली तसतसे भक्त महाकाल आणि श्री राम गीतांनी मंत्रमुग्ध झाले. अभिलिप्सा पंडा ने भगवान कृष्णासोबत भगवान शिवाच्या स्तोत्रांची अशी द्वंद्वगीत केली की लोकांचा दम सुटला. इतकेच नाही तर हर हर शंभू या गीत्तावर तालबद्ध होण्यास आमदार भोंडेकर स्वतःला रोकु शकले नाही. याच शृंखलेत प्रथम संध्याचे समापन शिव तांडव आणि शिव भस्म आरती ने करण्यात आली. या प्रस्तुती दरम्यान श्रोत्यांनी उभे होऊन प्रभू शंकर आराधना केली.