सामाजिक

राजस्थानी महिला मंडळ तर्फे हळदी कुमकुम कार्यक्रम संपन्न

Spread the love

बाळासाहेब नेरकर कडुन

अकोला येथील ब्राह्मण समाज महिला मंडळ तर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने झाली. यात गणेश वंदन नृत्यांमध्ये अनुष्का शर्मा , अरुणा तिवारी , परी मिश्रा, कृष्णा शर्मा, सानवी शर्मा यांनी पूजन व सादरी करण केले. उखाणे स्पर्धेत रेखा शर्मा , अर्चना शर्मा, सावित्री शर्मा , व राजस्थानी महिला मंडळाचे अध्यक्ष कीर्ती शास्त्री यांनी विशेष योगदान दिले. यात रेखा शर्मा यांना प्रथम क्रमांक, तर दुसरा क्रमांक अर्चना शर्मा यांना देण्यात आला. माया चौबे यांनी कार्यक्रमात वेगवेगळी वेश धारणा तरुण प्रथम क्रमांक ,लता जोशी यांना दुसरा क्रमांक प्राप्त केला. दुर्गा शर्मा यांनी चिरंजो च्या दाण्यापासून बनविलेले दागिने परिधान करून सर्वांचे मन जिंकले.
प्रीती शर्मा, निधी शर्मा, शितल शर्मा, पूजा मिश्रा यांनी मकर संक्रांतीचे सांस्कृतिक वर्णन केले. व ते नाट्यमय स्वरूपात समजावून सांगितले. कार्यक्रमात मनोरंजना सोबतच सामाजिक उपक्रम म्हणून सी ए कु. श्रुती मिश्रा, सी ए अनुजा शर्मा , सी ए विपिन शर्मा, कुमारी दीक्षा गजेंद्र मिश्रा बीएससी या विद्यार्थ्यांनी शिक्षणात यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
अडॅवोकेट नोटरी आफिसर ममता अमर तिवारी यांनी स्त्री ने तिचा जबाबदा-या , नोकरी आणि कुटुंब कसे हाताङले पाहीजे यांचे मार्गदर्शन अतिशय सुन्दर आणि सोप्या पद्धतिने समजावून सांगितले. ज्यामधे विशेष अतिथी म्हणून दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या सून व त्याच्या नातवा डॉ. रिया शर्मा आणि भाजपाच्या चे अघाडी शहर अध्यक्षा चंदा शर्मा यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करणयासाठी हल्दी कुंकुमचे वाटप, कलावा बंधन राजश्री पंडित यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिव मनीषा तिवारी यांनी केले, त्याना रीता मिश्रा यांचे सहकार्य लाभले. वान वाटप सह उपाध्यक्ष दुर्गा शर्मा यानी सहभाग नोदंवली.खजिनदार म्हणून किर्ति शर्मा यानी सहकार्य केले. तिळगुड वाटप प्रीती शर्मा यानी केले. फराडाची व्यवस्था सहसचिव गीता शर्मा यांच्या देखरेखी खाली करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या भंगिनीचे तसेच विशेष अतिथींचे राजस्थानी महिला मंडळअध्यक्षा किर्ती आनंद शास्त्री ,मार्गदर्शक विदया शर्मा यांनी आभार मानले. कार्यक्रमात राजस्थानी ब्राम्हण महीला मंडळाच्या शेकडोच्या संख्येत सदस्य उपस्थित होत्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close