बिडकीन,पैठण चिकलठाण परिसरात गुटखा माफिया सक्रिय ; अन्न व औषसी प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
बीड़कीन प्रतिनिधि: बिडकीन, चिकलठाण, पैठण परिसरात गुटखा माफिया पुन्हा सक्रिय झालेले दिसून येत आहे. ढोरकिन,कापूसवाडी, पिंपळवाडी, धनगाव, बालानगर, निलजगाव, पोरगाव, बिडकीन सर्वत्र गुटखा दिवस ढवळ्या दुचाकी,चारचाकी वर वाहतूक करताना पाहावयास मिळत आहे.मुख्य गुटखे माफिया बीडकिन पारिसरातिल असून ५२ खेड्यात गुटख्याचा माल पूर्वीत असल्याचे निर्देशनात दिसून येत. दररोज लाखो रुपयाची कमाई या अवैध्य व्यवसायातून होताना दिसत आहे. अन्न भेसळ प्रशासन यांच्याकडे जानीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. बिडकीन मध्ये दर दिवसाला हिरा, राजनीवास, गोवा, आर एम डी, विमल प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या घूटख्याची गाड़ी (अशोक लेलैंड बंद डब्बा,तवेरा,स्कोड़ा व वीवीद प्रकरचे कार्स ) भरून माल येतो असतो. घुटखा माफिया एवढे नीडर झाले की आम जनतेला सांगतात कोणालाही सांगायचे सांगा आमचे हप्ते चालू आहेत. आमचे कोन्ही काही वाकडे करु शकत नाही. काही दिवस बंद झालेले घुटख्याचा व्यवसाय परत काउंटर वर घुटखा वीक्र होताना दिसत आहे. जेएसपिनर, बिडकीन मध्ये पुन्हा हा व्यवसाय अति वेगवान गतिने चालू झाले आहेत. यांचावर आशीर्वाद कोण्हाचा आहे? हे पाहने महत्वाचे आहे.
अन्नभेसळ प्रशासनाचे जानून बुजून दुर्लक्ष
अन्नभेसळ प्रशासन जानून बुजून दुर्लक्ष करताना दीसत आहे.अन्नभेसळ प्रशासन कांचनवाडी काही कर्मचारी बऱ्याच वर्षापासून एकाच कार्यालायत कार्य करताना दिसत आहे. त्यांची कोणत्याही प्रकारची बदली कुठेही झालेली नाही. वरिष्ठांनी लक्ष देऊन अशा कर्मचाऱ्यांची त्वरित बदली करण्यात यावी.. अन्न भेसळ प्रशासनाचे शंभर रुपये टपरी हे न उलगडणार कोड आहे.कर्मचाऱ्यांचे फोन कॉल हिस्टरी वरिष्ठांनी तपासल्यास जिल्हयात कोणत्या अधिकारी, कर्मचार्याशी, कोणत्या गुटखा माफीयांशी संबंध आहे हे निष्पन्न होण्यास मदत होईल. बीड़कीन,पैठण,जेएस्पिनर अवैद्य गुटखा धंद्याविषयी अन्नभेसळ प्रशासनाचे एका वरिष्ठ अधिकारीयांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रतिनिधिने फोन कॉल केला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन कट केला व टेक्स्ट मी असा मेसेज पाठवला व त्याच टेक्स्ट मेसेज ची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केल्यास त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.