गणोजा येथील अनेक शेतकरी जलसिंचनापासून वंचित

चांदूर बाजार /राजेश खडसे
चांदूरबाजार तालुक्यातील गणोजा येथील जलसिंचन प्रकल्प चुकीच्या सर्वेक्षणामुळे गणोजा येथील असंख्य शेतकरी हे जलसिंचन प्रकल्पापासून वंचित राहत आहे जलसिंचनाचा जो सर्वे झाला आहे त्याचा मोजक्याच लोकांचा फायदा होत असून मौजा गणोजा ते बेलोरा जलसिंचन योजनेचा लाभ शहापूर हसमापुर या शेतकऱ्यांना लाभ न देता दुसऱ्या मौजातील शेतकऱ्यांना लाभ दिल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे गणोजा येथील 200 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र हे सिंचनापासून वंचित आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांना प्रश्न पडला की जलसिंचनाचा लाभ आम्हाला मिळाला नाही तर आम्ही जीवन कसे जगायचे येथील शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की चुकीचा झालेला जलसिंचनाचा सर्वे पुन्हा करून पीडित शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा असे निवेदन विभागीय आयुक्त, बळवंत वानखडे खासदार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी ,आमदार प्रवीण तायडे , उपविभागीय कार्यकारी अभियंता जलसिंचन प्रकल्प अचलपूर यांना देण्यात आले आहे गणोजा येथील शेतकऱ्यांना न्याय मिळेल का अशी चर्चा संपूर्ण तालुक्यामध्ये होत आहे. हे निवेदन देताना भागवत वानखेडे ,पंकज गेडाम ,बंडु गंधे ,
सुरेश ईसळ ,बाबाराव बोरकर ,
संजय वानखेडे ,विजय गंधे , राजाभाऊ वानखेडे ,ज्ञानेश्वर पाटील , सूरेश गंधे ,किशोर डांगे ,
आकाश गजभिये ,अरुण देशमुख,नरेंद्र पांडे , प्रभाकर तायडे, सोहन वानखेडे , साहेबराव गंधे हे
गनोजा येथील नागरिक उपस्थित होते.
अचलपूर येथील उपविभागीय अभियंता यांना फोन करून सांगितले की गनोजा येथील सिंचन प्रकल्पाचे वाढीव सर्वेक्षण करून काम लवकरात लवकर मार्गी लावावे .
प्रवीण तायडे आमदार अचलपूर मतदार संघ.
एक महिन्याच्या आत पुन्हा सर्वेक्षण करून वाढीव प्रस्ताव पाठवितो.
उपविभागीय अभियंता
मध्यम व लघु पाटबंधारे विभाग व जल सिंचन प्रकल्प , अचलपूर
गणोजा येथील दोनशे हेक्टर पेक्षा जास्त जमीन ही सिंचनापासून वंचित आहे गणोजा ते बेलोरा सिंचन प्रकल्प हा गणोजा साठी आला असून त्याचा लाभ मौजा गणोजा शहापूर , हशमपुर यांना मिळण्यात यावा लाभ न मिळाल्यास न्यायालयात जाऊ.योगेश वामनराव ईसळ , गणोजा शेतकरी