कृषि विज्ञान केंद्र, घातखेड अमरावती येथे आज रब्बी हंगामातील पिकांना घेऊन मार्गदर्शन कार्यक्रम
अमरावती / प्रतिनिधी
सर्व शेतकरी बंधू-भगिनींना कळविण्यात येते की कृषि विज्ञान केंद्र, घातखेड अमरावती येथे शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी रब्बी हंगामातील पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान व शेती क्षेत्राशी निगडित शासनाच्या महत्त्वकांक्षी योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याप्रसंगी नैसर्गिक शेती या विषयावर तज्ञ मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचे सह कृषी क्षेत्रात कार्यरत तज्ञ व्यक्ती उपस्थिती देणार आहेत. धनधान्य योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण सुद्धा यावेळी करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बंधू भगिनी विद्यार्थी यांनी सकाळी दहा वाजता उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र घातखेड तर्फे करण्यात आले आहे.