सोयगाव तालुक्यातील फर्दापूर धम्माचल परिसरात भव्य दिव्य १९ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आज …!
!
सोयगाव प्रतिनिधी
जगप्रसिध्द निर्णय रम्य वातावरणातील फर्दापूर ता. सोयगाव जि.छत्रपती संभाजीनगर च्या.७६ एकर परिसरात सालाबादप्रमाणे यंदासुद्धा ( दि.१५ ) नोव्हेंबरला शुक्रवारी १९ वी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ पाली अँण्ड बुध्दिझम या संस्थेच्या वतिने अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे यावेजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी दक्षिण कोरीया सह देश भरातील भिख्खुसंघ उपस्थित राहणार आहे. या साठी या परिषदेला मोठ्या संखेने बौध्द बांधवांनी उपस्थित राहण्याचे अव्हाहन आयोजकांच्या वतिने करण्यात आले आहे.
अजिंठा लेणी च्या पायथ्याशी फर्दापूर – धम्माचल येथे गेल्या १९ वर्षा पासुन धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात येते आहे या परिषदेला विदेशासह देशभरातील बौध्द भिख्खु येत असतात व उपस्थित उपासक उपसिकांना धम्मदेशना देतात या वर्षि सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ पाली अँण्ड बुध्दिझम या संस्थेच्या वतिने १५ नोव्हेंबर रोजी १९ वी अखिल भारतिय बौध्द धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदे अध्यक्ष म्हणुन भदन्त करूणानंद महाथेरो हे असनार आहेत. तर धम्म ध्वजारोहन हे डॉ. ली. ची. रॅन. माजि कुलगुरू बौध्द विद्दापिठ दक्षिण कोरीया यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर परिषदेचे उद्दघाटन मा. किम जिन सून माजी राज्यपाल गंगवॉन प्रांत. दक्षिण कोरीया. यांच्या हस्ते होईल. तर प्रमुख अतिथी म्हणून मा. हान की. सेओन.
संचालक क्रेडिट व गॅरंटी फर्म गंगवॉन प्रांत. दक्षिण कोरीया. मा. पार्क सांग डेंग मुख्यकार्यकारी अधीकारी सॉईल स्ट्रक्चर इंटरॅक्शन दक्षिण कोरीया हे उपसतिथ राहणार आहे. तर धम्माचल स्मणिकाचे प्रकाशन शिने अभिनेता गगन मलीक यांच्या हस्ते करण्यात येणार .या परिषदेत मुख्य धम्मदेशना भदंन्त धम्मसेवक महाथेरो (मुळावा)
अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भिख्खुसंघ. भदंन्त सुगतवंश महाथेरो. (जळगाव. )भदंन्त शरणानंद महाथेरो (पाथरी)
भदंन्त प्रा डॉ. खेमधम्मो महाथेरो. (मुळावा)भदंन्त
बोधीपालो महाथेरो (चौका )यांच्यासह भिख्खुसंघ धम्मदेशना देणार आहे. परिषदेची सुरूवात सकाळी नऊ वाजता फर्दापूर गावातुन धम्माचल पर्यंत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवनुक काढुन सुरवात करण्यात येणार आहे. तर दहा वाजता धम्मध्वाजारोहण करण्यात येणार आहे. आणि साडेबाराला धम्मपरिषदेचे उद्दघाटन करण्यात येणार आहे. या धम्मपरिषदेस बौध्द बांधवांनी मोठ्या संघेने उपस्तिथ राहण्याचे अव्हान भदंन्त डॉ. उपगुप्त महाथेरो. डॉ.एस. पी. गायकवाड, भिक्खू बोधिधम्मा यांनी केले आहे.