आरोग्य व सौंदर्य
भव्य रोग निदान ,शस्त्रक्रिया , व औषधी वाटप शिबीर
वर्धा / प्रतिनिधी
दत्ता मेघे उच्चशिक्षण संशोधन संस्थेचे कार्यकारी अधिकारी आणि वर्धा सोशल फॉर्म चे अध्यक्ष डॉ.अभ्युदय मेघे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दत्ता मेघे उच्चशिक्षण संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने रोग निदान ,शस्त्रक्रिया, उओचार व औषधी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या दि.17 डिसेंबर 2023 रोजी सेलू येथील दिपचंद चौधरी विद्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात मेडिसिन तज्ञ, बालरोग तज्ञ , हृदयरोग तज्ञ, कण नाक घसा तज्ञ , नेत्र रोग तज्ञ, स्वशन रोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ , मानसिक रोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ , न्यूरो सर्जन तज्ञ , त्वचारोग तज्ञ, दांत व मुखरोग तज्ञ , युरो तज्ञ उपस्थित राहणार आहेत.
शिबिराला येताना रुग्णांनी आधार कार्ड आणि रेशन कार्ड ची झेरॉक्स प्रत सोबत आणण्याची विनंती आयोजक वर्धा सोशल फोरम वर्धा यांनी केली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1