आध्यात्मिक
काटसूर येथे गोविंद प्रभू जन्मोत्सव थाटामाटात संपन्न
काटसुर / प्रतिनिधी
गोविंद प्रभू जन्मस्थान श्रीक्षेत्र काटपुर येथे गोविंद प्रभू जन्मोत्सव उत्सवा निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम श्री गीता पाठ उटी अभिषेक संपन्न झाल्यानंतर गावातून भव्य प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली मंदिरापासून ढोल ताशाच्या गजरात श्रीगोविंद प्रभूची काढलेली मिरवणूक या कार्यक्रमाच्या आकर्षण ठरले होते नरेंद्र मुनि पंजाबी दर्यापूरकर बाबा अमरावती कीर्तन सम्राट प्रकाश मुनी मराठी सोनपाटकर बाबा अचलपूरकर बाबा उद्धवराज वाकीकर परमपूज्य भोजराज लोणारकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते परिसरातील भक्त मंडळींची मोठ्या प्रमाणात गर्दी या कार्यक्रमाला दिसून आली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1