।शासनाने ज्वारी खरेदी सुरू करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
् राळेगाव तालुका प्रतिनिधी ्
् महाराष्ट्र शासनाने जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर ज्वारी खरेदी सुरू करण्यासाठी आज दिनांक 16/5/2024 रोज गुरूवारला जिल्हाधिकारी यवतमाळ यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री तथा विधानसभा सभा माजी उपाध्यक्ष प्राध्यापक वसंतराव पुरके सर आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगावचे सभापती अँडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.सोबतच तलावातील गाळ उपसा करण्यासाठी तोंडी माहिती दिली.त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब येथील सभापती प्रविणभाऊ देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगावचे उपसभापती तथा कांग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर अरविंद वाढोणकर , खरेदी विक्री संघ राळेगावचे सभापती मिलिंद इंगोले, वसंत जिनिंग राळेगावचे उपसभापती अंकुशराव रोहणकर , खरेदी विक्री संघाचे उपसभापती भरतराव पाल, कळंब कांग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष राजू पोटे,कळंबचे पदाधिकारी सोनू सिद्दिकी,खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक काचोळे, चंदूभाऊ चांदोरे, सिद्धेश्वर वाघमारे, यांच्या सह अनेक संस्था पदाधिकारी, नगरसेवक, शेतकरी बांधव उपस्थित होते.