हटके

सरकारी महिला डॉक्टर दोन तरुणांसह सापडली हॉटेल च्या खोलीत 

Spread the love

नवऱ्याने पत्नी आणि तिच्या सोबतच्या तरुणांची केली धुलाई 

कासगंज (उत्तर प्रदेश) / नवप्रहार डेस्क 

                          उत्तर प्रदेश च्या कासगंज मधुन एक अजब प्रकार समोर आलं आहे. येथे एका सरकारी महिला डॉक्टर ला तिच्या पतीने दोन तरुणांसह हॉटेल च्या रूम मध्ये रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर त्याने महिला आणि त्या दोन तरुणांची चांगलीच धुलाई केली आहे. मुख्य म्हणजे ही महिला डॉक्टर मागील गेक वर्षांपासून पती पासून वेगळी राहत होती. पतीला अल्पय डॉक्टर पत्नीवर पाहिले पासूनच शंका होती.

अनेक दिवस पतीला आपल्या पत्नीवर संशय होता व तो तिच्यावर लक्ष ठेवून होता. एके दिवशी ही महिला डॉक्टर दोन पुरुषांसह हॉटेलच्या खोलीत पोहोचली. पतीला याचा सुगावा लागल्यानंतर तो संपूर्ण कुटुंबासह हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने जबरदस्तीने रूमचा दरवाजा उघडायला लावला आणि आतमध्ये तिघांनाही पकडले. यानंतर त्याने पत्नीसह दोन्ही तरुणांना बेदम मारहाण केली. महिलेसोबत असलेला एक तरुण गाझियाबादचा तर दुसरा बुलंदशहरचा रहिवासी आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांनाही पकडून पोलीस ठाण्यात नेले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पती आपली पत्नी आणि तिच्या प्रियकरांना मारहाण करताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचाराला गुन्ह्याच्या श्रेणीतून काढून टाकले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलिस फार काही करू शकत नाहीत.

 

 

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close