क्राइम

15 महिन्याच्या मुलाला मारून नाल्यात फेकले

Spread the love

अपहरणाचा केला बनाव ,पण लागला नाही निभाव 

लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या पती पत्नीचे अमानुष कृत्य

मुंबई / नवप्रहार डेस्क

                  दोघेही विवाहित पण जोडीदारा सोबत पटत नसल्याने दोघेही ओडिशा येथुन मुंबईत पळुन आले. आणि लिव्ह इन मध्ये राहू लागले.पण ती येतांना आपल्या 15 महिन्याच्या मुलाला ओबात घेऊन आली होती. हा मुलगा त्यांच्या प्रमाणात अडसर ठरत आहे असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी त्याच्या पासून सुटका करण्याचा निर्णय घेतला . त्याला मारून नाल्यात फेकले आणि पोलिसात जाऊन त्याच्या अपहरणाची तक्रार दिली.पण चौकशीत सगळंच समोर आलं .

 मुंबईच्या जोगेश्वरी भागात ही अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मेघवाडी पोलिसांनी या प्रकरणी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याला अटक केली आहे.या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या 15 महिन्याच्या मुलाची तिच्या डोळ्यादेखत हत्या केली. कोणाला संशय येऊ नये, यासाठी त्यांनी मुलाच अपहरण झाल्याची खोटी तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी राजेश राणा (28) आणि बाळाची आई रिंकी दास (23) दोघांना अटक केली आहे. लिव्ह इनमध्ये राहणार हे जोडपं मूळच ओदिशाच असून ते चार महिन्यापूर्वी मुलासह मुंबईत आले होते. राजेश राणा मजुरीच काम करायचा.

रिंकी दास जोगेश्वरी भागातील कंस्ट्रक्शन साईटवर रहायची. या जोडप्याने मुलाच अपहरण झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर हे सर्व प्रकरण उघड झालं. या जोडप्याने प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या बाळाची आधी हत्या केली. त्यानंतर मृतदेर आरे कॉलनी जवळच्या नाल्यात फेकून दिला. राणा आणि दास या दोघांचा आधी दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह झाल्याच तपासातून समोर आलं. दासला तिच्या आधीच्या लग्नापासून मुलगा होता. तिने नवऱ्याच घर सोडताना मुलाला सोबत घेतलं नाही. त्यानंतर ती गावातच राहणाऱ्या तिच्या काकांच्या प्रेमात पडली. दास त्या नात्यातून गर्भवती राहिली.

पंचायतीसमोर काकाची लग्नाची कबुली

कुटुंबाला याबद्दल समजल्यानंतर पंचायत बोलवण्यात आली. काकाने पंचायतीसमोर तिच्यासोबत लग्न करण्याच आश्वासन दिलं. एकदिवस कामासाठी बाहेर जातो सांगून काका पळून गेला. दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंत रिंकी दास राजेश राणाच्या प्रेमात पडली. राणासोबत ती पळून मुंबईला आली. दुसऱ्याचा मुलगा आपल्यासोबत राहतो हे राणाला आवडत नव्हतं. त्यातून तो त्या बाळाला सतत मारहाण करायचा.

पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काय सांगितलं?

मंगळवारी राजेश राणाने आई रिंकी दास समोर बाळाला अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर आरे कॉलनीतल्या नाल्यात मृतदेह फेकून दिला. 22 मे रोजी मेघवाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बाळाचा किडनॅपिंग झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांना राणा जे सांगतोय, त्यावर संशय आला, पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close