पकडायला गेले एक आणि हाती लागली गॅंग
जळगाव / नवप्रहार मीडिया
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनेत वाढ झाली होती.त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी वाहन चोरांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश सर्व ठाणेदारांना दिले होते.नेमक्या याच काळात यावल ठाण्याच्या हद्दीतुन ट्रॅक्टर चोरीला गेले होते. वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होत होता . तर वरिष्ठांचा देखील दबाब होता. यावल पोलिस स्थानकात वाहन चोरीच्या दाखल गुन्हाचा तपास करताना पोलिसांच्या हाती वाहन चोरट्यांची मोठी टोळीच हाती लागली. पोलिसांनी १५ संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांनी ३७ मोटरसायकल व एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. त्यातील एका ट्रॅक्टरसह १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
यावल शहरातील कुंभार टेकडी परिसरातुन दिनांक १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर अजय मूलचंद पंडित यांचे ट्रॅक्टर चोरीला गेले होते. याबाबत येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध १८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्या संदर्भात पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार विजय पाचपोळे व राजेंद्र पवार करीत होते.
दरम्यान सदर तपास करत असतांना त्यांनी अर्जुन सुभाष कुंभार (वय १९ रा.कुंभारवाडा यावल) याच्यासह तिन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चौकशीत या तिघांनी ट्रक्टर सह दुचाकी वाहन चोरी केल्याची कबुली दिली असून त्यात अजुन काही जण सहभागी असल्याचे सांगीतले होते. या संदर्भात पोलिसांनी तपासात शहरातुन एकापाठोपाठ एक अशी एकुण १५ जणांची टोळीच चौकशीसाठी ताब्यात घेतली असून चौकशीत या सर्वांनी एक ट्रॅक्टरसह तालुक्यातील विविध गावातून तब्बल ३७ मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात १३ मोटरसायकली विविध भागातून हस्तगत करून आणल्या आहेत. यावलसह परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांची चोरी करणारी टोळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून या चोरट्यांनी तालुक्यासह परिसरातून वाहने चोरली असल्याची शक्यता असून आता पोलीस या दिशेने तपास करत आहेत.