गोपालभाऊ बकाले यांची आत्मा समितीच्या अध्यक्षपदी निवड
तालुका प्रतिनिधी– प्रकाश रंगारी
(चांदुर रेल्वे,) चांदुर रेल्वे येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा *(आत्मा*) अंतर्गत चांदुर रेल्वे तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीच्या आमला विश्वेश्वर येथील प्रगतशील शेतकरी गोपाळ प्रल्हादराव बकाले यांची अविरोध निवड करण्यात आली. आमदार प्रताप दादा अडसड यांच्या शिफारशीनुसार चांदुर रेल्वे तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला. तसेच चांदुर रेल्वे पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद सदस्य हे या समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून काम पाहतात. आत्मा समितीच्या झालेल्या प्रथम सभेमध्ये निवड झालेल्या सदस्या मधून गोपाळ प्रल्हादराव बकाले यांची सर्वानुमते आत्मा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी चांदुर रेल्वे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र बांबल व चांदुर रेल्वे पंचायत समिती सभापती प्रशांतभाऊ भेंडे त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे यांचा वाढदिवस असल्याने सर्व समिती सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. सभेला आत्मा समितीचे सदस्य डॉ. संजय मते, गजानन इंगोले, मोतीराम चव्हाण, प्रदीप राऊत, सुभाष भस्मे , राजेश नीहाटकर नितीन हंबर्डे, राजेश जळीत, अमोल नखले, यांच्यासह सर्व आत्म समिती सदस्य व आत्माचे सचिव परीक्षित मालखेडे, दिनेश मोंढे उपस्थित होते.