तीन लाखाच्या सुगंधित गुटख्यासह ५ लाख ४३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
अमरावती गुन्हे शाखेची कारवाई
अचलपूर बनत आहे एवैध धंद्याचे ठिकाण
अनेकदा कारवाई करूनही आरोपी त्याच धंद्यात गुंतलेले
अचलपूर प्रतिनिधी -:किशोर बद्रटिये – महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला सुगंधी सुपारी गुटखा जुळ्या शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत सुगंधीत विविध कंपनीच्या सुगंधी सुपारी असा ५ लाख ४३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे .
प्राप्त माहितीनुसार अमरावती ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अचलपुर शहरातील च्यावलमंडी स्थीत एका ठिकाणी सांयकाळी टाकलेल्या धाडीत राज्यात बंदी असलेला सुगंधित गुटखा पकडण्यात आला .पोलिसांना खबराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार चा व लमंडी स्थिती एका ठिकाणी गुटख्या ची तस्करी ,वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . पोलिसांनी घटना स्थळी धाड टाकली असता अचलपूर चावलमंडी येथील स्टेट बँकेसमोर असलेल्या दुकानात बोलेरो पिक अप वाहनातून गुटखा पुळ्यांचे पोते खाली होत असताना दिसले पोलिसांनी धाड टाकून पचनामा करून प्रीमियम नजर गुटखा , ( १४२४ नग ) नजर गुटखा 9000 नग जप्त केला असून आरोपींकडून बोलेरो पिकप एम एच १२ जीटी १५ ४४ व अंदाजे २ लाख ९३ हजार १२०रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून असा एकूण ५ लाख ४३ हजार १२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
आरोपी नसीर उर्फ मुक्तार खान वय . 56 वर्ष रा . दुल्हागेट , शेख इरफान शेख बुराण वय ३० वर्ष रा . मोमीनपुरा यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता 188 277 273 आयपीसी अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन पवार हेट कॉन्स्टेबल युवराज मानमुळे स्वप्निल तवर सागर यांनी पार पाडली . पकडून दिलेला गुटखा अचलपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला .