सामाजिक

भजन-पुजन, श्रमदानातून ग्राम सफाई

Spread the love
घाटंजी न. प ची स्वच्छता हीच सेवा अभिनव उपक्रम
घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी- नगर परिषद व विश्वस्नेह फाउंडेशन व्दारा दी. 29/9/24 रोजी ग्राम स्वच्छता खरा धर्म जपत ‘आधी कारा ग्राम सफाई मगचं दूर होईल गावातील रोग राई’.म्हणत स्वच्छ सर्वेक्षण 2024 मिशन स्वच्छता मोहीम व रुक्षरोपण कार्यक्रम राबविण्यात आला. सध्या गावातील मुख्य रस्त्या मधिल दुभाजक सुशोभिकरण अंतर्गत्त रुक्षरोपण,कठडे लावणे, साफसफाई करणे मोहीम होत आहे.एक ‘दिवस माझ्या गावासाठी’ उपक्रम सुरु आहे. याच उपक्रम अंतर्गत स्थानिक पांढूर्णा रोड परिसरात स्वच्छता दूत गाडगे बाबा,ग्राम सुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचाराने प्रेरणा घेत राष्ट्रनिर्माण विचारधारा संच व गावातील स्वच्छते बदल तळमळ असलेल्या लोकांच्या सहभागातून ग्राम सफाई कार्यक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे सकाळी संगितमय भजन -पुजन, ग्राम सफाई भजनातून व स्वच्छता दूत गाडगे बाबा वेशभूषा करुन पांढूर्णा रोड परिसराची श्रमदानातून सफाई करण्यात आली. या अभिनव कार्यासाठी न.प. मुख्याधिकारी राजु घोडके, कर्मचारी देशट्टीवार, राष्ट्रनिर्माण विचारधारा संच चे गजेंद्र ढवळे, बोपटे सर, साबापूरेए सर,  कला शिक्षक दिलीप हेमके, पांढूरंग किरणापूरे, गजु राऊत, उमेश कोरांगे, दीवटे सर, अमित प्रधान, सूनिल हूड, गोलू फुसे, व ईतर ही समाजसेवक न.प. सफाई कामगार, घाटंजी कर नागरिक बहूसंख्याने उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close