अंजनगावात भाजपाचे घर, घर चलो अभियान
अंजनगाव सुर्जी ( मनोहर मुरकुटे)
*माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळाला ९ वर्ष पूर्ती निमित्य “जनसंपर्क से जनसमर्थन” , सेवा सुशासन आणि गरीब कल्याण 9 वर्ष पूर्ती ह्या कार्यक्रमाचे आयोजनानुसार मा नरेंद्र मोदी सरकारने गेली नऊ वर्षात देशातील गरीब जनतेसाठी गरीब कल्याण अन्न योजना, प्रत्येक घरापर्यंत नळाचे पाणी, गरिबांसाठी जन,धन खात्यांची सुविधा ,किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये ची मदत, पीक विमा, किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मदत, कृषी सिंचाई अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ, आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत असलेल्या लोकांना नोकऱ्या, 390 नवीन व्हीध्यापिठे, व 7 आय आय टी कॉलेज ची स्थापना, कौशल्य विकास योजनेअंतर्गत युवक प्रशिक्षित, गरीब महिलांसाठी उज्वला गॅस योजना, मातृ वंदना योजना, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत रोग निदान व उपचार, जनौषधी केंद्रावर स्वस्त दरात औषधी उपलब्ध, मध्यमवर्गीय लोकांना सर्व सुख सोई युक्त अश्या विविध योजनेची माहिती ही प्रत्येक घरापर्यंत पोहचली पाहिजे ह्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, यांचे संयुक्त विद्यमाने प्रभाग क्र 1 मध्ये माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, नगरसेविका सौ सुनीता मनोहर मुरकुटे, शिलाताई सगणे, मनोहर भावे, डॉ विनोद देशमुख, माजी शहराध्यक्ष मनोहर मुरकुटे,कृष्णा गोमासे, ,सरचिटणीस राजेंद्र रेखाते, युवा मोर्चा अध्यक्ष,हर्षल पायघन, शिक्षक आघाडीचे विनोद दुर्गे बुथप्रमुख सुनील बेराड, शंकर येउल,सुभाष थोरात, विनोद सोनटक्के, रितेश आवंडकर, गौरव चांदूरकर, नंदू भोंग, दीपक दाभाडे, ह्यांनी प्रभागातील प्रत्येक घर, घर चलो अभियान राबविले असून केंद्र शासनाच्या वतीने राबिविण्यात आलेल्या योजनांचे सर्वत्र कौतुक होत आहे