भगवंत होता येणार नाही, पण भगवतप्रिय व्हा!’. ह.भ,प. चारुदत्त आफळे.
कीर्तन पुष्प ३
कीर्तन महोत्सव आयोजन समित्ती यवतमाळ द्वारा आयोजित भव्य कीर्तन महोत्सव वर्ष १७ वे
यवतमाळ (का.प्र.)
महाराष्ट्र ही संतांची भूमी विश्वविख्यात आहे. १२ व्या शतकात ज्ञानदेवें रचिला पाया, उभारिले देवालया ।।’ आणि त्यानंतर अनेक संतांची मांदियाळी या महाराष्ट्रात निर्माण झाली. संतश्रेष्ठ तुकोबारायांनी या देवालयावर कळस चढविला. नेमकं याच काळात आपल्या देशात सुलतानशाही, मोगलशाही, इंग्रजांनी अत्याचाराचा कळस चढविला. धर्मांतराच पीक आलं. ज्ञानदेवादी भावंडानी, जनार्दन, एकनाथांनी, नामदेवांनी जाती धर्मातील कलह नष्ट करून भक्ती, उपासनेच महत्त्व पटवून दिलं. समर्थांनी, तुकाबारायांनी शिवाजी घडविला. आसेतू हिमालया पर्यंत ही लोकजागृतीची ध्वजा फडकविली.“काय या संतांचे मानूं उपकार। मज निरंतर जागविती’’ या संतश्रेष्ठ तुकोबारायाचा अभंगाचे निरुपण करताना ‘भगवंत होता येणार नाही, पण भगवत प्रिय व्हा!’’ असा संदेश ह.भ.प. चारुदत्त आफळे पुणे यांनी दिला. कीर्तन महोत्सव आयोजन समिती द्वारा आयोजित कीर्तन महोत्सवात तृतीय कीर्तन पुष्प गुंफताना भक्तांच्या मनामध्ये भक्तिची ज्योत जागविली. जनजागृतीचे कार्य निरंतर जागविले. त्यांच्या या कार्यापुढे त्यांच्या पायी जीव ठेवणे सुद्ध यतविंचित आहे असे स्वत: तुकोबाराया म्हणतात ही त्यांची महानता आहे. त्यांचा एक एक शब्द सुद्धा हा हितोपदेशच असतो जशी गाय आपल्या पाडसावर निःस्वार्थ प्रेम करते तसा, असे प्रतिपादन त्यांनी केले त्यांचे स्वागत प्रकाश देशमुख व दिलीप मादेशवार यांनी केले. देशाप्रती धर्माप्रती जनभावना तिव्र करण्याचे कार्य जे आज सुद्धा सुरु आहे त्या ईश्वरीय कार्यात सहभागी होऊन पुण्यकार्य करा असे आवाहन करुन त्यांनी आपल्या पूर्वरंगाची सांगता केली. श्री अनंता मधुसुदना’ हे प्रार्थनागीत गंगाधर बुवा देव यांनी सादर करून तसेच कीर्तनाचे डबल इंजिन तबला वादक सचिन वालगुंजे व äसौरभ देवधर यांनी कीर्तनान रंग भरला.
उत्तरार्धात धर्मासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणार्या धर्मरक्षक भाई बालमुकुंद यांचे आख्यान सादर केले. भारतमातेच्या परवशता पाशाला तोडण्याचे आवाहन करणार्या लाला लजपतराय यांना उत्फुर्त प्रतिसाद देणारे बालमुकुंद यांनी आपल्या चार मित्रासह दिल्लीच्या मिरवणुकीत २३ डिसेंबर १९१२ रोजी चांदणी चौक येथे त्याच्यावर अग्निअस्त्राचा मारा करून त्यांचा माहुत व ऐरावत तसेच लॉर्ड हार्डिंगला रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि ८ मे १९१५ रोजी आपल्या सवंगड्या सोबत फासावर चढला. तसेच त्याच्या पत्नीने सुद्धा त्यांच्याच चितेवर आत्मसमर्पण केले. चितेत उडी घेतांना त्याची पत्नी रामरखी हिने टाहो फोडत आवाहन केले की, पुढच्या जन्मात देश धर्म रक्षणासाठी मी बालमुकुंद सारखेच वीर पुरुष जन्माला घालीन’ असे यावेळी भाष्य केले. असंख्य श्रोतृवृंदाच्या डोळ्यात अश्रु तरळले. तसेच दिव्यांग अंध बांधव भगिनीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. हिन्दुत्व संस्काराचे प्रणेते मा.चंद्रशेखर गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी आपल्या कीर्तनाची सांगता केली. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सेवा समर्पण संस्थेत विविध विषयाचे ज्ञान आत्मसात करणार्या दिव्यांग बंधु भगिनींचा व संस्थेचे अध्यक्ष प्रशांत व प्राची बनगिनवार यांचा समितीचे अध्यक्ष सुरेश वैâपिल्यवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. दिप प्रज्वलन सुरेश वैâपिल्यवार, अरविंद तायडे, मधुकर बोबडे, अरुण भिसे यांचे हस्ते करण्यात आले आरतीचे यजमानपद वैशाली गोखले, जयश्री मेहंदळे, लिना भांदककर, अपर्णा बडे, संगीता ओमनवार, विमल गोरे, अर्चना काळे, ललीता घोडे यांनी भूषविले.