हटके
युट्यूबर ज्योती मल्होत्रा आपल्यातीलच एक शत्रू
भारतीय गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या.ऑपरेशन सिन्दुर दरम्यान सक्रिय झाल्या होत्या. दरम्यान एक मॅसेज ट्रॅप झाला. आणि गुप्तचर यंत्रणेचे कान उभे झाले. हा मॅसेज हिसारवरून पाकिस्तान ला डिलीव्हर करण्यात आला होता. या मॅसेज चा शोध घेत स्थानिक पोलिसांच्या मदतीने ज्योती च्या घरी पोहचले. ज्योतीचा तो निरागस आणि लोभस चेहरा पाहून त्यांना देखील ती पाकिस्तान साठी हेरगिरी करत असेल यावर विश्वास बसत नव्हता. पण ….
‘ भोली सुरत दिलके खोटे ‘ हे हिंदी गाणे तुम्ही ऐकले असाल अगदी असच ज्योती बद्दल बोलता येईल. कारण तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तर या निरागस चेहऱ्याची मुलगी पाकिस्तान साठी हेरगिरी करेल असे मुळीच वाटणार नाही. पण म्हणतात न की कोणाच्या चेहऱ्यावर जाऊ नये ज्योती साठी हे गाणे तंतोतंत खरे ठरते.
दिल्लीपासून अंबाल्यापर्यंत आणि लाहोरपासून कराचीपर्यंत तिचे अनेक मित्र बनले. पोलिस सूत्रांनुसार, पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशलाही ज्योतीने आधी आपल्या जाळ्यात अडकवले होते आणि त्याच्या मदतीने व्हिसा मिळवला होता. विशेष म्हणजे, नंतर ती स्वतः दानिशच्या जाळ्यात अडकली. त्यानंतर पाकिस्तानात पोहोचल्यानंतर दानिशच्या सहाय्याने ती तिथल्या गुप्तचर यंत्रणेतील अनेक अधिकाऱ्यांच्या संपर्कात. असे सांगितले जाते की, ज्योती पाकिस्तानात अशा प्रकारे हावभाव दाखवायची की, अधिकारीही तिच्याभोवती फिरायचे. तिचे वडील हरीश मल्होत्रा यांनी सांगितले की, 2020 पूर्वी ती दिल्लीत एका छोट्या संस्थेत नोकरी करायची, जिथे तिला फक्त 20 हजार रुपये पगार मिळायचा. तरीही ती 12 हजार रुपये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहून ऐषोआरामाचे जीवन जगायची. त्या वेळी तिच्या फ्लॅटचे वीज बिलच चार ते पाच हजार रुपये यायचे.
एवढ्या कमी पगारातही ती अनेकदा मोठमोठ्या हॉटेलांमध्ये जायची.
अशी आली रडारवर
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय गुप्तचर यंत्रणा खूप सक्रिय होत्या. सूत्रांनुसार, याच दरम्यान एक संदेश ट्रॅप झाला होता. हा संदेश हिसारमधून पाकिस्तानला पाठवला गेला होता. या संदेशाच्या डंपचा पाठपुरावा करत लष्करी गुप्तचर यंत्रणा ज्योती मल्होत्राच्या घरी पोहोचली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले.
त्या वेळी ज्योतीच्या निष्पाप चेहऱ्याकडे. जासूस असल्याचा विश्वासच बसत नव्हता, पण तिच्या मोबाइलमधील कॉल डिटेल्स, फोटो-व्हिडिओ, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामवरील चॅटिंग पाहून पोलिसांचेही. ज्योतीचे साथीदारही अटकेत
सध्या पोलिसांनी ज्योतीला कोर्टात हजर करून पुढील तपासासाठी पाच दिवसांच्या कोठडीत घेतले आहे. तसेच, ज्योतीच्या सूचनेनुसार आणि ओळखीच्या आधारावर तिचा साथीदार अरमानला नूंह मेवातमधून अटक करण्यात आली आहे. अरमानलाही पोलिसांनी कोर्टात हजर करून सहा दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे. याचबरोबर हरियाणातील पानीपत येथून नोमान इलाही आणि कैथल येथून देवेंद्र सिंह ढिल्लो यांनाही पकडण्यात आले आह. पोलिस या सर्वांची चौकशी करत आहेत.
जासूस बनण्याची कहाणी समोर
यूट्यूबर ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा स्वतः आश्चर्यचकित आहेत की त्यांची मुलगी पाकिस्तानची जासूस आहे. त्यांना तर हेही माहित नाही की ती कोणकोणत्या देशांमध्ये फिरली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांना फक्त एवढेच माहित आहे की ती व्हिडिओ बनवते आणि यूट्यूबवर टाकते, ज्यामुळे तिला पैसे मिळतात. पण, यूट्यूबवरून तिला किती कमाई होते, हेही त्यांना माहित नाही. हरीश मल्होत्रा यांनी सांगितले की, त्यांचा ज्योतीच्या आईपासून घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर ज्योती दिल्लीत राहून नोकरी करू लागली होती. लॉकडाउनमध्ये तिने नोकरी सोडली आणि घरी आली, तेव्हापासून ती व्हिडिओ बनवत आहे. त्यांनी आपली मुलगी निर्दोष असल्याचे सांगितले, पण असा संशय व्यक्त केला की व्हिडिओ बनवताना ती पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्य संपर्कात आली असावी.