अधिक सामाजिक योजनेत सामावून घेण्याचे आमिष देत दाखल करायला लावला बलात्काराचा खोटा गुन्हा
कोलकाता / नवप्रहार डेस्क
महिलांच्या बाजूने अस्ललेल्या कायद्याचा महिला अनेक वेळा दुरुपयोग करतात हे अनेक वेळा पाहायला मिळते. काही वेळा राजकीय लोकं किंवा सामान्य नागरिक गरीब महिलांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेत एखाद्या चांगल्या व्यक्तीला फसवण्यासाठी त्यांना विविध आमिष देऊन त्यांच्या कडून असे कृत्य करवून घेतल्याचे देखील प्रकरण उघड होत असतात.
. एकीकडे देश कोलकाता येथील शासकीय वैध्यकीय महाविद्यालयातील ट्रेनीं डॉक्टर वर झालेल्या बलात्कारच्या प्रकरणात पेटून उठला असताना दुसरीकडे मात्र एका महिलेने तिला आशिक शासकीय योजनाचा लाभ मिळवून देण्याच्या आमीषाला बळी पडून तिच्या मुलीवर बलात्कार झाल्याची खोटी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे तीन आरोपीना एक महिना न्यायालयीन कोठडी भोगावी लागली. आता न्यायालयात या महिलेने खोटी तक्रार दिल्याचे मान्य केले आहे.
हा गुन्हा तिने राजकीय दबावाखाली येऊन दाखल केल्याचे सांगत तिने न्यायालयाची माफी मागितली. पण या घटनेमुळे आता चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, खोट्या बलात्काराच्या खटल्यात तिघांनी जवळपास एक वर्ष तुरुंगात काढल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
महिलीने सांगितले की, आपल्या गरिबीमुळे आणि स्थानिक राजकारण्यांच्या दबावाखाली हा खटला दाखल केला. नेत्यांनी त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, न्यायमूर्ती अरिजित बॅनर्जी आणि न्यायमूर्ती अपूर्व सिन्हा रे यांच्या खंडपीठाने ट्रायल कोर्टाला तीन आरोपींविरुद्धचा खटला बंद करण्याचे निर्देश दिले. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला महिला आणि तिच्या मुली विरोधात तपास करण्याचे आदेशही दिले. खोटी तक्रार दाखल करून खोटे पुरावे तयार करणाऱ्या महिलेवर कायदेशीर कारवाई करायची का? याचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संबधित महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा दावा केला होता. आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी जवळपास वर्षभर न्यायालयीन कोठडीत होते. पण, नंतर महिलेने हे खोटे प्रकरण असल्याचे मान्य केले. न्यायालयाने ही बाब गांभीर्याने घेतली. त्यानंतर तिने बिनशर्त माफी मागितली.
दरम्यान, स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली ही खोटी तक्रार केल्याचे महिलेने सांगितले. तिने सांगितले की, तिचा पती 2017पासून अंथरुणाला खिळलेला आहे. त्याचे उत्पन्न खूपच मर्यादित आहे. राज्य सरकारकडून विविध सामाजिक योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मदतीवर ते अवलंबून असल्याचे तिने सांगितले. जुलै 2023 मध्ये काही स्थानिक नेत्यांनी खोटी कथा रचण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला. महिलेने खोटा गुन्हा दाखल केल्यास तिच्या कुटुंबाला अधिक सामाजिक योजनांमध्ये सामावून घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे न्यायालयाला सांगितले.
.