सामाजिक

शाळेच्या आवारात घुसलेल्या बिबट्याने आठ वर्षीय बालकाला उचलून नेत केले ठार 

Spread the love

नंदुरबार / नवप्रहार डेस्क 

                        आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या आठ वर्षाच्या मुलाला तो रात्री लघुशंकेसाठी उठला असता बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत त्याला ठार केल्याची घटना  तालुक्यातील लोय येथे घडली आहे. आश्रम शाळेवर अनेक दिवसांपासून सुरक्षा रक्षक नसल्याचे समोर आले आहे. शाळा प्रशासनाच्या या गलथान कारभारा विरोधात जनतेत प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. 

या थरारक घटनेमुळे आश्रमशाळा प्रशासन आणि वनविभागाविषयी प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मनोहर कालूसिंग वसावे (आठ वर्षे, रा. कोठली, पो. मोरंबा, ता. अक्कलकुवा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोय येथे आदिवासी प्रकल्प विभागाची शासकीय प्राथमिक आश्रमशाळा आहे. आश्रमशाळेचा आवार मोठा असून, गावलगच्या शेतांना लागूनच शाळेचा आवार आहे. बुधवारी मध्यरात्री १२ वाजेनंतर मनोहर वसावे हा बालक लघवीसाठी उठला. बाहेरच आश्रमशाळा आवारात तो लघवी करीत असताना आश्रमशाळेच्या उघड्या गेटमधून बिबट्या आला असावा. बालकावर काही कळण्याच्या आत त्याने झडप घालत त्याला गंभीर जखमी करून ठार केले. मुलांना ओरडण्याचा आवाज आल्यावर शाळा आवारात पाहणी केली असता भयानक दृश्य दिसले. बालकाला लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

शाळेला सुरक्षा रक्षकच नाही –  आश्रमशाळेला अनेक दिवसांपासून सुरक्षा रक्षकच नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय बुधवारच्या रात्री मुख्य प्रवेशद्वार उघडे होते. आश्रमशाळेच्या आजूबाजूला मोठे भिंतीचे कुंपण आहे. त्यातून बिबट्या आत येऊ शकत नाही. उघड्या प्रवेशद्वारातूनच आला असावा असे बोलले जात आहे.

वनविभागाला आढळले बिबट आणि तरसाच्या पावलाचे ठसे – दरम्यान, वनविभागाने या भागात पहाणी केली असता बिबट्या आणि तरसाच्या पावलांचे ठसे आढळून आल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे मात्र आश्रमशाळा प्रशासन आणि वनविभागाच्या गलथान कारभारामुळे संताप व्यक्त होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close