घुगघुस येथिल ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात “सत्कार स्त्रि शक्तीचा”कार्यक्रम
घुग्गुस / श्रीनिवास सुद्धाला
देशाच्या प्रगतीत महिलांचे अतुलनीय योगदान -किरण बोंडे.
घुगघुस, प्रतिनिधी/श्रिनिवास सुद्धाला
महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढण्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो,ह्या निमित्ताने शहरातील ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात “सत्कार स्त्रि शक्तीचा”कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे,माजी.जि.प.सदस्या नितू चौधरी,माजी.ग्रा.पं.सदस्या.सुचिता लुटे,कुसुम सातपुते, सत्कारमूर्ती सविता शाह,कमला दुर्गम उपस्थित होते.या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्प गुच्छ देऊन करण्यात आले तसेच सत्कारमूर्ती वेकोली कर्मचारी असलेल्या सविता शाहू,कमला दुर्गम यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाल,श्रिफळ, सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आपले विचार व्यक्त करताना प्रयास सखी मंच घुगघुसच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या,आज स्त्रि कोणत्याही क्षेत्रात मागे नाही.स्त्रि पुरुषच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करिता आहे.स्त्रियांनी जमिनीवरच नाही तर अंतराळात सुद्धा उत्तुंग भरारी घेतली आहे.शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापार अशा विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करिता आहे . देशाच्या प्रगतीत महिलांचे विशेष योगदान आहे.
संचालन भाजपा महिला आघाडी घुगघुसच्या अध्यक्षा पुजा दुर्गम यांनी केली.या वेळी विणा घोरपडे,प्रिया करकाडे, अर्चना लेंडे, सुनिता पाटील,सुमन वऱ्हाटे कल्पना वैरागडे,रेखा मेश्राम, पुजा बोढेकर,मंदा ठेंगणे आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.