घोडीवर बसलेल्या नवरदेवाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

श्योपुर (मध्यप्रदेश )/ नवप्रहार ब्युरो
हल्ली तरुणांना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी 10 वर्षांच्या मुलांपासून ते 205 ते 30 वर्षाच्या तरुणाला देखील अटॅक येत आहे.काही दिवसांपूर्वी लग्न समारंभात स्टेज वर डान्स करताना तिचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच नवरदेव असलेल्या तरुणाला घोडीवर बसल्या बसल्याच हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने क्षणात आनंदी वातावरण दुःखात बदलले आहे.
सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण घोड्यावर बसून आल्याचे पाहायला मिळत आहे. अचानक त्याला चक्कर येते आणि तो खाली कोसळतो. या व्हिडिओमधील तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने जागीच निधन झाल्याचे म्हटले जात आहे. हा व्हायरल व्हिडीओ मध्यप्रदेशमधील श्योपूर येथील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. लग्न समारंभ सुरू असतानाच घोड्यावरून स्टेजकडे निघालेल्या नवरदेवाची अचानक तब्येत बिघडली व घोड्यावर खाली कोसळला. नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर लग्न मंडपातील आनंदी वातावरणावर क्षणात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, श्योपूरमध्ये लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. पंडितजींनी वधू-वरांना सात फेऱ्यांनी आणि नामजपाने सात जन्मासाठी पवित्र बंधनात एकमेकांशी बांधून ठेवले, तोपर्यंत नवरदेवाच्या आकस्मिक मृत्यूने खळबळ उडाली.
वर वऱ्हाडी मंडळीसह लग्न मंडपात पोहोचला. घोड्यावर बसून स्टेजच्या दिशेने जात असतानाच नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागले व तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी नवरदेवाला मृत घोषित केले.
मृत्यूपूर्वी नवरदेवाने घोडीवरून उतरून वऱ्हाडी मंडळींसोबत जोरदार नृत्य केले आणि मग घोडीवर स्वार होऊन मिरवणूक पुढे जाऊ लागली. वधू स्टेजवर नवरदेवाची वाट पाहत होती पण नवरदेव येण्यापूर्वीच तिला त्याच्या मृत्यूची बातमी समजली. नवरदेवाच्या मृत्यूने संपूर्ण श्योपूर शहरात शोककळा पसरली आहे. प्रदीप जाट हा काँग्रेसचे प्रदेश सचिव योगेश जाट यांचा पुतण्या होता. एनएसयूआयचे ते माजी जिल्हाध्यक्षही राहिले आहेत.