टाकळी (सलामी )येथील ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा,ग्रा.पं. सदस्य यांनी केली गटविकास अधिकाऱ्यां कडे तक्रार,
बच्चुभाऊ कडू यांच्या पत्रावरून थातूरमातूर चौकशी केल्याचा काष्टे यांचा आरोप.
नेर;- नवनाथ दरोई
नेर पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकळी सलामी येते ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे जनतेचे आरोग्याला धोका निर्माण झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की टाकळी सलामी येथील जनतेला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा पाईप लाईन गटर मधून गेली असून, जागोजागी फुटल्यामुळे त्या जागेवरून घाण पाणी जमा होत. व ज्या दिवशी नळ सोडल्या जाते त्या दिवशी ही घाण पाणी नळाच्या माध्यमातून अनेकांच्या घराघरात जात असल्याने टाकळी येथील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.तसेच पिण्याच्या टाकीवर झाकन नसल्याने त्यामध्ये निसर्गाच्या पाण्यासह पशुपक्षी घान टाकतात. तसेच टाकी महीनीगीनती धूत नसल्याने पिण्याच्या पाण्यात नारू असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत च्या परिसरात पाहणी केली असता घाणीचे साम्राज्य दिसून आले. गावातील नाल्याचा उपसा होत नसल्याने नालीतील पाण्याची दुर्गंधी परिसरात दरवळत आहे. याबाबत नेर येथील गटविकास अधिकारी यांना लेखी तक्रार दिली असता त्यांनी पाठवलेल्या चौकशी अधिकारी सहाय्यक अशोक राऊत व पंचायत समिती विस्तार अधिकारी जी.व्हि. धर्माळे यांनी थातूरमातूर चौकशी केल्याचा आरोप रवींद्र काष्टे यांनी केला. ही चौकशी अचलपूर मतदार संघाचे प्रहार संस्थापक बच्चू कडू त्यांनी 27 /12/ 23 ला पत्र क्रमांक 19 54 /2023 वरून करण्यात आली.गटविकास अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे. तसेच गटरमधून गेलेली पाईप लाईन सरपंच व ग्रामसेवक यांनी दुरुस्त करुण घ्यावी.अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर रवींद्र काष्टे आदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.