घाटंजीत संत नामदेव महाराज जयंती उत्साहात साजरी
समाजात आपसी हेवादावा विसरत एकसंघ राहण्याची अध्यक्ष सचिन कर्णेवार यांची मंचावरुन समाज बांधवास विणवणी*ल
*समाज संघटन शिवाय समाजाची प्रगति अशक्य*
घाटंजी ता प्रतिनिधि-
दि.13/11/24 रोज बधवार ला सायंकाळी शिंपी समाज बहूउदेशिय संस्था र. न. 5064 च्या माध्यमातून समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती उत्सव शिंपी समाज भवण घाटी- घाटंजी च्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी अध्यक्ष राजु दिकूंडवार होते तर प्रमुख पाहूणे दतात्रय पोटपल्लीवार, सामाजिक कार्यकर्ते महेश पवार, शिंपी समाज घाटंजी ता अध्यक्ष सचिन कर्णेवार उपस्थित होते. कार्यक्रम सूरवात संत प्रतिमेला माल्यार्पण व दिप पूजन करुन करण्यात आली तदनंतर सचिव शंकर पोटपल्लीवार यांनी संत नामदेव महाराज जिवन चरित्र वर प्रकाश टाकत उपस्थित मान्यवरांचे समाज कार्यकारणी तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .कार्यक्रम अंतर्गत समाजातील 10 वी 12 वी व ईतर क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी आणि विवीध पदावर लागलेल्या व्यग्तीचा मान्यवर हस्ते स्मृतीचीन्ह, प्रशस्तिपत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार, गुण गौरव करण्यात आला. उपस्थित समाज बाधवास मंचकावरुन मार्गदर्शन करतांना अध्यक्ष सचिन कर्णेवार यांनी संतानी दीलेली शिकवण जपत ‘ठेविले अनंते तसेची रहावे चिंती असू द्यावे समाधान’ म्हणत समाजात आपसी हेवादावा विसरत समाज कार्यात प्रत्येकाने सहभाग घ्यावा व समाजात संघठन ठेवावे. संघठन ही काळाची गरज आहे. आपण आपल्या जिवणाचे शिल्पकार व्हावे वाटत असल्यास समाजातील प्रत्येक घटकाला आपल्यात सामावून घेत मदतीचा हात द्यावा जेणे करुन स्व प्रगति सोबत समाज प्रगती साधता येईल असे मत व्यक्त केले.कार्यक्रम अध्यक्ष स्थानि बोलताना दीकूंडवार यांनी संता च्या कार्यातील विवीध दाखले देत उपस्थितात नव चैतन्य निर्माण केले. बहूसंख्यक महीला, पुरुष, यूवकाची कार्यक्रम प्रसंगी उपस्थिति होती. कार्यक्रम संचालन शंकर पोटपल्लीवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार विजय दिकूंडवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी काशिनाथ नोमूलवार, बंडू बूर्रेवार, संतोष पोटपल्लीवार, उमेश अक्केवार, आशिष कर्णेवार, प्रशांत राजूलवार, उमेश माकडवार, राहूल दिकूंडवर,देविदास पोटपील्लेवार , अमोल कर्णेवार, रुपेश ंमूलवार, रामचंद्र गटलेवार,यश पोटपील्लेवार, संस्कृत गटलेवार, सौ.निलम कर्णेवार, राजश्री नमुलवार, कोमल कर्णेवार ,प्रिया पील्लेवार, संध्या ताई शिंगेवार, सविता पोटपील्लेवार,पुजा अक्केवार, अनुराधा सिंगेवार, योगिता पोटपील्लेवार सह ईतर महीला तथा समाज बांधवांनी सहकार्य केले.