सामाजिक

घाटंजी येथे संत शिरोमणी भिमाभोई जयंती महोत्सवाचे आयोजन

Spread the love

 

घाटंजी / प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश भोई समाज संघटना व श्री संत भिमाभोई जयंती उत्सव समिती, घाटी-घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी भिमाभोई १७५ वी जयंती महोत्सव दिनांक २५ मे २०२५, रविवार रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्ताने स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रम व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे, ठाणेदार निलेश सुरडकर, मारोतराव पढाल, महादेवराव वाघाडे, राहुल पढाल, माझी नगरसेविका सिताबाई गिनगुले, माजी नगराध्यक्ष राम खांडरे, माजी उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सतीश मलकापुरे, महेश पवार, मधुकर निस्ताने, माजी नगरसेवक परेश कारिया, भाजप शहराध्यक्ष गजानन ढवळे, मनोज हामंद, निखिल देठे, अंकुश ठाकरे, सुरज हेमके, मुजूभाई पटेल, निलेश चव्हाण, श्रीकांत राठोड यांची प्रमुख उपस्थिती असेल.
दुपारी २ वाजता महाप्रसाद व सायंकाळी ७ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष नीरज मन्ने, उपाध्यक्ष नितेश बावणे, सचिव गणेश बावणे व भोई समाज तालुका घाटंजी यांनी केले आहे. तसेच समस्त भोई समाजाने संगणमत करून २५ मे २०२५ रोज रविवारला घाटंजी मच्छी मार्केट बंद ठेवण्यात येईल असे जाहीर केले आहे..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close