घाटंजी तालुका शिंपी समाज संस्था र्.न. ५०६४ ची कार्यकारिणी गठीत

अध्यक्षपदी सचिन ना कर्णेवार तर उपाध्यक्ष पदी विजय दी. दीकुंडवार यांची सर्वानुमते निवड.
घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार
घाटंजी तालुका शिंपी समाज संस्था र्.न.५०६४ च्या वार्षिक आमसभेत नवनिर्वाचित कार्यकारिणी ची पारदर्शक निवड मा. केशवराव शिंगेवार साहेब यांचे मार्गदर्शनात व अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या निवडणूक प्रक्रियेत माजी अध्यक्ष मा.राजु दीकुंडवार सर हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते.सभा बहुसंख्य सभासदांचे उपस्थित पार पडली. सभेत माजी सचिवांनी संस्था कार्यकारिणी चे ५ वर्ष काळातील पारदर्शक कामावर प्रकाश टाकला व सन.२०२२-२०२३ सालचा जमा खर्च,ईतीवृतांत,समाजाचा संस्था लेखाजोखा मांडताना सर्व सभासद सहमतीने ठराव घेत समाजाच्या प्रगतीसाठी समाज बांधव व कार्यकारिणी सदस्य म्हणून आपली जबाबदारी प्रतेक सभासदांनी घेत स्वयंस्फूर्तीने समाज कार्यात सहभाग घ्यावा हे मत ही व्यक्त केले.सभा नियोजन बद्ध व सर्व शिंपी समाज बांधव आणि सभासद यांचे खेळीमेळीच्या वातावरणात पार
पडली.या सभेत मागील कार्यकारिणीचा कालावधी संपुष्टात आला असल्याने नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली यात अध्यक्ष पदी सचिन कर्णेवार, उपाध्यक्ष विजय दीकुंडवार,सचिव शंकर पोटपील्लेवार,सहसचिव संतोष पोटपील्लेवार
कोषाध्यक्ष प्रशांत राजुलवार
सदस्य म्हणून बंडूजी बुर्रेवार,उमेश अक्केवार,काशिनाथ नोमुलवार उमेश माकडवार,प्रितीताई नमुलवार,आशिष कर्णेवार यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.सभेला मावळतीचे अध्यक्ष चंद्रशेखर नोमुलवार,उपाध्यक्ष संजय दीकुंडवार,रवि पोटपील्लेवार,वसंत वझ्झलवार,बाबु पोटपील्लेवार,सौ मिनाक्षी ज्ञा.पोटपील्लेवार,ज्ञानेश्वर गटलेवार,कवडूजी पोटपील्लेवार, अमोल कर्णेवार,दतात्रय पोटपेल्लिवार ,विलास गटलेवार,सुरेश दीकुंडवार तथा इतरही संस्था सभासद व समाज बांधव आणि महीला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. सभा यशस्वीतेसाठी बाबु पोटपील्लेवार,रवी पोटपील्लेवार व ईतरही समाज बांधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.