घाटंजी ता. कालेश्वर येथिल सीआरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू
घाटंजी ता प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
घाटंजी :-तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कालेश्वर येथील सीआरपीएफ जवान राजेंद्र मनोहर कोवे वय 32 वर्ष यांचा धुळे येथे दि. 24 एप्रिल रोजी कर्तव्यावरून परत येत असताना मोटरसायकलने अपघात झाला. त्यांना तातडीने उपचाराकरिता धुळे येथे दाखल करण्यात आले होते मात्र सात दिवस मृत्यूशी झुंज देऊन अखेर महाराष्ट्र दिनी या जवानाची प्राणजोत मावळली. आज दि. 3 मे रोजी घाटंजी तालुक्यातील कालेश्वर या मुळ गावात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतक राजेंद्र हा 2017 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सीआरपीएफ मधे त्यांची निवड झाली. सात वर्षाची देशाकरिता सेवा देत असताना दि. 24 एप्रिल रोजी कर्तव्यावरून घरी येतांना मोटरसायकलच्या अपघाताने ते गंभीर जखमी झाले होते त्यांना धुळे येथेच उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मृत्यूची झुंज देत अखेर एक मे रोजी महाराष्ट्र दिनी या जवानाने शेवटचा श्वास घेतला. मृतक जवान राजेंद्र या मागे आई -वडील,पत्नी व एक छोटा मुलगा, दोन भाऊ व मोठा आता परिवार आहे.
( धुळे येथे शासकीय रितीरिवाजाप्रमाणे मानवंदना )
जवान राजेंद्र यांनी शेवटचा श्वास घेतातच धुळे येथील बटालियन ने त्यांना दोन मे रोजी शासकीय नियमानुसार मानवंदना देऊन मृतदेह घाटंजी तालुक्यातील कालेश्वर येथे त्यांच्या मूळ गावी दि. 3 मे रोजी आणण्यात आले. यावेळी धुळे बटालियनचे वरिष्ठ अधिकारी व काही जवान या अंत्यसंस्कारा करिता उपस्थित होते.सदर जवानाची मृत्यूची बातमी कळतात परिसरातील संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. परिसरातील आप्तस्वकीय व मित्रमंडळी अंत्यसंस्कारासाठी गर्दी झाली.सकाळी दहा वाजताच्या सुमारास कालेश्वर येथे गोंडी रीती रिवाजाप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर सिआरपीएफ जवानाच्या मृत्यूची बातमी प्रशासकीय स्तरावरून पारवा पोलिसांना कळविण्यात आले नसल्याच कळते.मात्र मृत्यूची माहिती मिळतात पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष खातेदार संदीप नरसाळे व काही कर्मचारी यांनी अंत्यसंस्काराला हजेरी लावून आपले कर्तव्य बजावले.
ooooooooooooooooooo