Uncategorized
घाटंजी प्रहार शिक्षक संघटनेचा स्नेहमिलन सोहळा संपन्न

घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
प्रहार शिक्षक संघटना जिल्हा यवतमाळ शाखा घाटंजी अंतर्गत संघटनेच्या सर्व शिलेदारांचा वार्षिक स्नेहमिलन सोहळा-२०२४ हा स्थानिक रसिकाश्रय संस्था पांढरकवडा रोड, घाटंजी येथे मोठ्या उत्सहात पार पडला. प्रहार शिक्षक संघटनेच्या शाखा घाटंजीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे स्नेहमिलन व विचारांची देवाणघेवाण व्हावी हा उदात्त हेतू ठेवून या अभूतपूर्व सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाकरीता यवतमाळ जिल्हा शाखेचे पदाधिकारी कुलदीप डंभारे( जिल्हाध्यक्ष ) अमोल गोपाळ जि. सचिव विलास राठोड जि.संघटक, कीशोर मुंडे (जि. उपाध्यक्ष).अमोल घुमे (ता. अध्यक्ष यवतमाळ, संतोष चौधरी ता. घाटंजी सचिव ,आशिष जमदापूरे जिल्हा तंत्र सहायक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम सुरुवात छञपती शिवाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनांन करुन करण्यात आली. तदनंतर मान्यवरांचे स्वागत समारंभ घेण्यात आला.किशोर मालविय सर यांनी प्रास्ताविकातुन आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रम अंतर्गत धोगडे व हेमलता फुलझेले मॅडम जि.प.शाळा माथणी यांचा झेप व माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमास जिल्हास्तरीय उत्तुंग यश प्राप्ती बद्दल शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जि.प.उ.प्रा.म शाळा, पिंपरी व दहेगांव शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विमानवारी करीता प्रेरीत करणारे मार्गदर्शक शिक्षक पवन राऊत सर पिंपरी व कु.पौर्णिमा निमसरकर मॅडम दहेगांव, नवोदय करिता मार्गदर्शक प्रशांत दीडशे ही शाल, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप डंभारे यांनी आज पावेतो संघटनेसाठी दिलेल्या योगदाना बद्दल सर्व पदाधिकारी व सदस्यांमार्फत शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी संघनेची स्थापना ते आजपर्यंतची केलेली वाटचाल याबद्दल माहिती दिली तसेच सर्वांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी अनेक शिक्षकाना तसेच पं.स.घाटंजी येथे नव्याने रुजू झालेले शिक्षक यांचे सुद्धा प्रहार कुटूंबात पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रहार कुंटुंबातील सर्व सदस्यांचे खेळ व उपक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नैना भोयर तर आभार प्रदर्शन प्रशांत दिडशे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रहार शिक्षक संघटना शाखा घाटंजी चे सुनील कुमरे ,राजेश मुनेश्वर विनोद लोखंडे, अतुल भोयर, प्रफुल वातीले, शालिक धाबर्डे, वैभव भोयर,कल्पना केराम , रुपाली कुटे, सुष्मा पडगिलवार सह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी कार्यक्रमाच्या यशस्विते करिता परिश्रम घेतले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1