टवाळखोर लोकांमुळे चिडीमारीचे प्रमाण वाढले
शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना त्रास
हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांना माहिती कशी नाही ?
यवतमाळ / विशेष प्रतिनिधी
जिल्ह्यातील आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या घाटंजी शहरात सुरू असलेल्या जुगार , वरली मटक्या सारखे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच यामुळे शहरात टवाळखोरी वाढली असून शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना याचा त्रास होत असल्याचा आरोप भाजपा अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष मुज्जमिल जफर पटेल यांनी केला असुन याबाबत वरिष्ठांना देखील तक्रार केली आहे.
तक्रारकर्ते पटेल यांनी पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि एसडीपीओ यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , शहरात असलेल्या शि. प्र. म. कन्या शाळा असून येथे उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शिक्षण दिले जाते. याठिकाणी शहरासह तालुक्यातील गावातील मुली शिक्षणासाठी येतात. शाळेच्या पश्चिम बाजूला शहराचा मुख्य रस्ता आहे तर दक्षिण बाजूला आठवडी बाजार .
आठवडी बाजार आहे अवैध कारोभारा चे माहेरघर – तक्रार कर्त्या नुसार आठवडी बाजार अवैध कारोभाराचे माहेरघर आहे. येथे वरली मटका, जुगार ,चेंगड या सारखे व्यवसाय खुलेआम चालतात.
दारुड्यांच्या वागणुकीमुळे विद्यार्थिनीना करावा लागतो लज्जास्पद गोष्टींचा सामना – या अवैध धंदयाकडे येणारे दारुडे शाळेच्या खिडकीजवळच लघुशंका आणि ओकाऱ्या करतात. हा लज्जास्पद प्रकार विद्यार्थिनींच्या डोळ्यादेखत होतो. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. आणि स्त्री जातीचा घोर अपमान आहे.
अवैध व्यावसायिकांचे जनतेला खुलेआम चॅलेंज – अवैध व्यावसायिक जनतेला खुलेआम चॅलेंज करतात की जो कोणी त्याचा व्यवसाय बंद करून दाखवेल त्याचे बँड बाजा सहित स्वागत करण्यात येईल .