घाटंजी पोलीसांची गोमांस विक्रीवर कारवाई
४० किलो गोवंशाचे मास केले जप्त.
घाटंजी तालुका प्रतिनिधी – सचिन कर्णेवार
घाटंजी-पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घाटी परिसरातील एका घरात गौवंशाचे मास विक्री करीत असल्याची खास गोपनीय माहिती वरुन घाटंजीत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसहघटनास्थळी सकाळी साडेसहा वाजता छापा मारून गोमांस पकडले. या छाप्यात घराच्या संरक्षण भिंतीवरून आत मध्ये प्रवेश केला असता गोमांस धुवून बारीक तुकडे करून पोत्यात भरून ठेवत असताना आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा कत्तलीसाठी उपयोगीत आनलेली अवजारही ताब्यात घेण्यात आली. घटनास्थळावरून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.अनेक दिवसापासून जनावराची कत्तल होत असल्याची ओरड गौ प्रेमी व जनतेतून होत होती यावर पोलिस प्रशासनाने लक्ष केले होते परंतू खात्रीलायक माहिती मिळत नसल्याने पोलिस वाट पाहत होते हे विशेष.मात्र या प्रकरणात मिळालेल्या खास गोपनीय माहितीच्या आधारावर दी. १८/०७/२३ रोजी सकाळी साडेसहा वाजता ही कारवाई करण्यात आली.अचानक पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे गौवंशाची मास विक्री उघडं झाली. या कारवाईमुळे अवैध गौतस्कर व्यावसायीकांत धडकी भरली. सदर कारवाईच्या वेळी मुद्देमाल अंदाजे ४० किलो गौवंश मास ,दोन सुरी, दोन कुऱ्हाड,४ लोखंडी धारदार सत्तुर जप्त करण्यात आले.या प्रकरणी आरोपी शेख तनवीर शेख कुरेशी वय ३६ वर्ष,शेख जमीर शेख कुरेशी वय ३० वर्ष रा गुरूदेव वार्ड घाटी. शेख सलीम शेख रहीम कुरेशी वय ३६ रा.सुभाष वार्ड घाटी शेख अलीम खैरात कुरेशी वय ३८ वर्ष रा. गुरुदेव वार्ड यांना अटक करून त्यांच्या विरुध्द कलम ५ (अ)(ब)(क)९ प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम ४३९,३४ भा द वी नुसार गुन्हे नोंद करण्यात आली असल्याची कळते.
सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी येथिल पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर ,पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम, दिनेश जाधव, प्रविण तालकोकुलवार राहुल खंडागळे यांनी केली आहे.