सामाजिक

घाटंजी फोटोग्राफर असोसिएशन ने दिव्यांग व गरजवंताला शैक्षणिक साहित्य वाटप करून केला जागतिक छायाचित्र दीन साजरा.

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार

१९ ऑगष्ट रोजी जागतिक छायाचित्र दीना निमीत्य घाटंजी फोटोग्राफर असोशिएशन् गृप तर्फे मुक,कर्णबधीर शाळा चोरांबा रोड व शाळा क्रं.१ न.प. घाटंजी येथिल गरजवंत ३५ विद्यार्थ्यांना चित्रकला बूक,रंग साहीत्य व खाउचे वाटप करून जागतिक छायाचित्र दीन साजरा केला.छायाचित्र म्हणजे नूसते चित्र नसून जन्माला येण्यापूर्वीच फोटोतुन जन्माला येण्याची चाहूल व मृत झालेल्या व्यग्तीला फोटो यातूनच अक्षरशा चित्राच्या माध्यमातून मृत पावल्यावर ही जिवंत म्हणजे अमृत करण्याची कला आहे. केवळ क्यामेरा गळ्यात घातला की फोटोग्राफर झाले अस होत नाही तर,त्या क्यामे-यातून घेतलेल्या चित्रात जिवंतपणा आणण्याचे कौशल्य जो साकारतो तो फोटोग्राफर.अशा फोटोग्राफर च्या जिवणाचा भाग म्हणजे जागतिक छायाचित्र दीन त्या निमित्ताने आपणही समाजातील गरजवंत दिव्यांच्या जिवणात रंग भरावी व तो क्षण अमूल्य ठरावा हा उदात्त हेतूने हा कार्यक्रम घाटंजी फोटोग्राफर असोशिएशन् घ्या वतीने घेन्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी घाटंजी फोटोग्राफर असोशिएशन् अध्यक्ष किशोर ठाकरे, उपाध्यक्ष अजिंक्य रुईकर,सल्लागार,अनिल कलोडे,पप्पु भाऊ भोरे,राजु इंगोले,यश ठाकरे,निवृत्ती बाभुळकर,संदीप धांदे,अमोल वारंजे,नासिर शेख,अमित डंभारे,मनिक्ष राठोड,दादाराव राठोड,रवि भोजवार,मिलींद लिंगायत,आशिष भोयर, हर्षल बंगळे,नितीन ढवळे,निखील बुर्रेवार,गुल्हाणे, संदीप वानखडे,राज राठोड,लाला जैस्वाल,सागर भरणे,सुनिल कोटरंगे,व इतरही फोटोग्राफर असोशिएशन् मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन कर्णेवार व अजिंक्य रुईकर यांनी परिश्रम घेतले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close