घाटंजी सरकारी दवाखाना रस्ताची दैयनिय अवस्था
पेशंट दवाखान्यात घेऊन जातांना रस्त्यामुळे अर्धा लांबा होतो
प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे जनतेची मागणी.*
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
सध्या घाटंजी नविन पाईपलाईन टाकने जोमात सुरु आहे त्यामुळे रस्ता लगतच्या परिसरातील बाजुला जेसेपी व मशीनने नाली खुदाई चालू असून त्यामुळे नवसाने मागुन झालेल्या चांगल्या रस्त्याची या नाली खोदकामात पार वाट लावली जात असल्याचे चित्र दिसत आहे.नविन पाईपलाईन ही केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यामधे होत असली तरी, या कामाला पाईप लाईन टाकते वेळी संमंधीत ठेकेदार कडून चालवल्या जाणाऱ्या खुदाई मशिनवर स्थानिक न.प.प्रशासन अधिकारी कुठलेही लक्ष पुरवताना दिसत नाही. नाली खंदतांना रस्ता बंद ठेवले असेल तर त्याचं साधं फलकही कुठे लावले जात नाही. सरकारी दवाखाना रस्ताची अवस्था या खोदकामात सुत्रबधता व कुणाचेही वचक नसल्यामुळे फार बिकट झाल्याच दिसत आहे. नवसाने मागून झालेल्या चांगल्या रस्ता बाजुला पाईपलाईन टाकने करीता केलेली खोदकाम ची माती रस्त्यावर टाकल्या जात असल्यामुळे रस्ताची वाट लावली जात आहे. पेशंट दवाखान्यात दाखल करण्यात येण्याआधीच रस्त्याच्या दूर्रावस्थेमुळे अर्धातचं लंबा होत आहे. या गंभीर बाबीवर संमंधीत अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी आता जनतेतून जोर धरु लागली आहे.