घाटंजीत ओबीसीचे स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यासाठी आंदोलन पेटणार…
गुरवारला ओबीसी प्रवर्ग चे घाटंजीत जयस्तंभ चौकात लाक्षणिक उपोषण व सत्याग्रह
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
भारतात गुलामगिरीत इंग्रजाच्या काळात 1931 मध्ये ओबीसीची जनगणना करण्यात आली होती.त्यानंतर जनगणना झाल्यात पण,स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यात आली नाही.सध्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत सुरु असून महोत्सवानंतरही येथील ओबीसीची जात निहाय जनगनना केली गेली नाही.महाराष्ट्रात स्वातंत्र नंतरचे काळात केंद्रात व राज्यात अनेक पक्ष सत्तेत आले मात्र माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग सरकारचा काळ वगळता कोणत्याही सरकारने ओबीसीच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष दिले नाही. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाचा सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक आणि राजकीय विकास पाहिजे तसा झाला नाही उलट विकास खुंटला. देशात व राज्यात ओबीसी समाज 52% च्या वर असूनही लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना त्यांचे न्याय, हक्क ,अधिकार मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे.महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा उद्रेक सुरू आहे, राज्यकर्ते ओबीसीच्या आरक्षणातुन ईतर समाजाला आरक्षण देण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.असे झाल्यास येणाऱ्या काळात तेली, माळी,कुणबी,शिंपी,अलुतेदार व बलुतेदार आणि इतर अत्यल्पसंख्यांक ओबीसी घटक ओबीसी ला मिळालेल्या आधीचे तुटपुंज्या आरक्षणापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांचे उपस्थितीत ओबीसीच्या ज्वलंत प्रश्नाला घेऊन बिहार राज्या प्रमाणे ओबीसीची जात निहाय जनगणना करण्यात यावी व ओबीसीच्या 27% आरक्षणाला धक्का लाऊनये या मागण्यांच्या पूर्तते करिता सदर आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनाचे नेतृत्व पांडुरंग निकोडे,मोरेश्वर वातीले ,गजानन काकडे, संघपाल कांबळे,सचिन कर्णेवार,अरविंद चौधरी,मनोज राठोड,नितीन राठोड ,गणेश मुद्दलवार,महेश भोयर,राजू बल्लूरवार,अमोल ठक,विजय हिवरकर,कुणाल तांगडे,दशरथ मोहुलै ,पंकज नरसेकर ,उमेश मोहुलै,पंकज प्रधान,गौरव शेंडे, मारुती ढोले,कपिल चौधरी, रत्नाकर शेंडे करीत असून प्रमुख उपस्थिती सर्वश्री सतीश मलकापूरे,सुनील देठे,मोतीरावण कनाके,रुपेश कल्यमवार,अनंत चौधरी, सतीश भोयर, भगवान डोहळे,अशोक मोहुर्ले, प्रेमानंद उमरे,रा.वी.नगराळे,दिनकर मानकर,बालाजी पोटपेल्लीवार आकाश नडपेलवार,अर्जुन जाधव,विष्णू कोवे सहभागी होणार आहेत. ओबीसींच्या जागरूक नागरिक व समाज बांधवांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.