ब्रेकिंग न्यूज

घाटंजीत आगिने दूकान जळून खाक

Spread the love

 

नागरिकांच्या सतर्कतेनी मोठा अनर्थ टळला

श्रीराम फटाका सेंटर थोडक्यात बचावले

घाटंजी ता प्रतिनिधि-सचिन कर्णेवार १७/१२/२४
घाटंजी मुख्य वस्तितील जलाराम मंदिर समोरील एका कॉम्प्लेक्स मधे खादी कापड दूकानाला सकाळी 9.30 च्या सूमारास विदूत शॉट सरकीट च्या कारणामूळे अच्यानक आग लागली. बघता बघता आगिने दूकानाचे आत असलेल्या कापडास पेट घेऊन आगित धूर निघण्यास सूरत केली असता त्या कॉम्प्लेक्स समोर उभे असलेल्या ढफली, अजय माकडवार यांना दूकानातून धूर निघतांना दीसून आला असता त्यांनी वेळीच समयसूचकता दाखवत त्या धूकानाकडे धाव घेत पाहणि केली असता आगीने आतून रोद्र रुप धारन केल्याचे दीसून आले.लागलीच त्यांनी आग लागलेले दूकान मालक, ईतर शेजारील दूकानदार,यांना फोन वर संपर्क करत घटनेची गंभीरतेची माहीती दीली. सकाळच्या हवेत बघता बघता आगिने रोद्र रुप धारन करुन ईतर दोन, तिन दूकानला वेढा घेतला.या घटनेची माहीती घाटंजी न. प. ला कळताच त्वरित अग्नि शामक गाडी व न प. कर्मचारी, पोलिस प्रशासन घटनाथळी पोहचले.अथक परिश्रमा नंतर अग्नि शामक च्या पाणिफवा-याने आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी घटनेची माहीती गावात पसरल्याने बघणा-यांची गर्दी जमली होती. आगित एव फॅशन सेल चे अतोनात नूकसान झाले तर आगिची झळ जोती बुट हाऊस, तनूश्री मेन्स वेअर ईतर काही दूकानास पण लागली.
या आगित विशेष म्हणजे श्रीराम फटाका सेंटर, एटीएम, आदीत्य अनघा बॅक शाखा थोडक्यात बचावली.चुकून जर का आगिने श्रीराम फटाका सेंटर ला कवेत घेतले असते तर खूप मोठा अनर्थ झाला असता. आगिचे कारण सध्या जरी शॉट सर्किट दीसत असले तरी नेमकी आग कशाने लगली याचा तपास घाटंजी पोलिस करित आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close