घातक मांज्या धाग्याची घाटंजी सह तालुक्यात सर्रास विक्री सूरु
घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
मकर संक्रांत जवळ आली की पतंग उत्सवात सर्व दंग होतात. आकाशात उंच उंच रंगीबेरंगी पतंग उडवण्याचा व एक मेकांची पतंग कापण्याच्या स्पर्धेत प्रत्येक हवसी मग्ण होत आपली पतंग कटल्या जाणार नाही व उंच उडवण्यासाठी नायलॉन मांजा धाग्याचा सर्रास वापर करतात. प्लास्टिक, कृत्रिम घटकापासून व काचेचा वापरातून अतिघात नायलॉन धागा मात्र पक्षी, प्राणी, व मानवी जीवनात घातक ठरत आहे. अतिसूक्ष्म असल्याकारणाने पतंग उडवताना कटून कुठेतरी पडून हा धागा कित्येकदा रस्त्याने चालणाऱ्याचे गळ्याला लागून जीवित हाणी व दुखापत झाल्याचे दिसून येते.पतंग उडताना पक्षांना हा धागा न दिसल्याने यातून इजा होत असते.अशा घातक मांजा वर शासनाने कितीही निर्बंध लादले तरी बाजारात व्यवसाय व पैसे कमवण्याच्या हव्यासापटी दुकानात मांजा सर्रास विक्री व साठा केल्याची दिसून येते. तालुक्यात परिस्थिती पाहता अशा घातक मांज्या साठे बाजावर कुठलीच शासकीय यंत्रणा काम करताना दिसत नाही. घाटंजी शहरातही मांज्याची सरास विक्री सुरू आहे.अशावर न.प.प्रशासन, व्यापार अस्थापना विभाग, व निर्बंधीत वस्तू विक्री विभागातील अधिकारी वर्गाने लक्ष पुरवून विक्रेत्यावर दंडात्मक कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्या शिवाय मांज्या सारख्या बंधितील धागा बंदी कायदा हा केवळ कागदावरच राहून लोकांचे जिव घेत राहील.असी ओरड आता घाटंजी कर जनतेतून होत आहे. यावर संबंधित अधिकारी वर्ग कीती कठोरतापूर्वक लक्ष पुरवून कार्यवाही करेल हे त्यांची कार्यवाही पाहून लक्षात येईल.
00000000000000000