100 % टक्के मार्क मिळवनार्या श्रेया विलास भोळे हिचा आदर्श नवशिक्षितानी अगींकारावा- आमदार सावरकर
अकोला / प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तुत्वाने सीईटी परीक्षेत ओबीसी मधून शंभर टक्के मार्क मिळवून महाराष्ट्राचे व आपल्या अकोल्याचे नाव उज्वल करणाऱ्या कुमारी श्रेया विलास भोले ह्यि विध्यार्थीनीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढीला शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी भातृ सेवा संघ व काळबांडे सर यांनी नवीन उपक्रम राबवून समाजाला दिशादर्शक कार्य केल्याची प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
स्थानिक गौरक्षण रोड या भागामध्ये भातृ मंडळ तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष एम एन पाटील हे होते तर ललित काळबांडे राजेश इंगळे सुधीर इंगळे विलास भोळे सौ भोळे व संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अनेक संकटावर मात करत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शैक्षणिक चे महत्व लक्षात घेऊन स्पर्धेच्या काळामध्ये या वीध्यार्थीनिने शंभर टक्के मार्क मिळवून महाराष्ट्राचे नाव व अकोला जिल्ह्याचे नाव उज्वल करण्याची परंपरा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा आमदार रणधीर, सावरकर यांनी स्वागत अभिनंदन केले आज साडेतीनशे विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी सरस्वती पूजन तसेच शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करण्यात आले.