जागतिक पर्यावरण दिनी ओमशांती मुख्य शाखा हिवरखेड तर्फे वृक्षारोपण

हिवरखेड बाळासाहेब नेरकर
पाच जुन जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ओम शांती मुख्य शाखा हिवरखेड तर्फे आसरा माता मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने व होत असल्याने जागतिक तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे अनण्यासाधारण महत्व आहे. विशेषतः भारता सारख्या कृषिप्रधान देशात तर सत्तर टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे, शेती पावसावर अवलंबून आहे आणि पाऊस वृक्षावर अवलंबून आहे हे सगळे सृष्टीचक्र लक्षात घेता ओम शांती मुख्य शाखा हिवरखेडच्या संचालिका ब्रम्हकुमारी रश्मी दीदी सौ. तारापुरे ताई, सौ. मानसेता ताई पंचबूधेताई,भोंडेताई,सौ ईलरकर,सौ रेखातेताई ठवकरताई ,डांगेताई तसेच बालकुमार यांच्या उपस्थितीत आसरा माता मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी सौ. टावरी ताई, सौ. अंजली नेरकर, सौ. विमल ऊबरकार ताई यांच्या हस्ते सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले.तसेच हिवरखेड पोलीस स्टेशनचे आवारात सूद्धा ठानेदार राठोड दुय्यम ठानेदार गोपाल गीलबिले गणेश साबळे, पाटिल याना सूध्दा वृक्ष भेट देऊन पोलीस स्टेशनचे आवारात वृक्ष लावून पर्यावरण दिन साजरा करत वृक्ष भेट दिले ढबाले प्लाट, पंचबूधे प्लाट मधे सूद्धा शिवमंदिर परीसरात वृक्ष लावले व त्याचे संगोपणाची काळजी घेन्याचे दिदीनी नांगरीकाना पर्यावरनाचे महत्व पटवून दिले