सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे गीता जयंती उत्साहात साजरी
हिवरखेड / बाळासाहेब नेरकर
स्थानिक हिवरखेड येथील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या सेंट पॉल अकॅडमी मध्ये आपल्या सांस्कृतिक ठेवा ही जपण्याचे काम करत असल्याच पाहायला मिळाले आहे. आज 11 डिसेंबर म्हणजेच गीता जयंती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया, प्रमोद चांडक, लुनकरण डागा, दीपक लखोटिया, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी, उपमुख्याध्यापिका निमित्त गांधी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अंकित शर्मा सर (श्रीमद भगवद्गीता स्कॉलर )उपस्थित होते. इयत्ता नर्सरी ते केजी 2 च्या विद्यार्थ्यांनी गीतेतील वेगवेगळे श्लोक म्हणून त्यांचा अर्थ आपल्या जीवनाशी कशा प्रकारे समरूप आहे हे सादर केले त्यानंतर इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गीतेतील प्रसंग नृत्याद्वारे व नाटकाद्वारे सादर केले. त्यानंतर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये गितेचे किती महत्त्व आहे यावर आपले विचार व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अंकित शर्मा यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की शाळेमध्ये अध्ययन अध्यापना बरोबरच आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी कशी निर्माण करता येईल, विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्श कसे निवडावे यावर त्यांनी प्रकाश टाकला सर्वात शेवटी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव तिवारी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंकुश अमानकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता सुलभा येलुकार मॅडम, विमल येऊल, शशिकांत दही,पूजा बाजारे मॅडम,ढोले मॅडम, खारोडे सर,,अमित सर, अतिक सर,सचिन सर,रविंद्र सर, अनुप सर, अजिंक्य सर, नितीन सर, अजय इंगळे सर, नागपुरे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.