हटके

गायकीच्या नावामागे वेश्याव्यवसाय ; महिला दलालास अटक 

Spread the love

मीरारोड / नवप्रहार मीडिया

            स्वतःला  कव्वाली गायक म्हणवून घेणाऱ्या एका महिलेचा खरा चेहरा समोर आला आहे. आपल्या चमूतील तरुणींना आंबटशौकीन लोकांना पुरवुन त्यांच्या कडून वेश्याववसाय करवून घेणाऱ्या आणि त्यातून आपले कमिशन घेणाऱ्या महिला  दलालास मीरा भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिकबंधक शाखेने सापळा रचून अटक केली आहे .

                          आलिशान जीवनमान जगण्यासाठी किंवा तसे जीवनमान जगण्याचे वेड लागलेल्या  तरुणी किंवा महिला कधी वाम।मार्गाला लागल्या हे त्यांचे त्यांनाच कळत नाही . एकदा जर का या मार्गाला लागले तर त्यातून बाहेर पडणे अशक्य असते.काही तरुणींना नोकरीचे आमीः दाखवून सुद्धा या व्यवसायात ढकलले जाते. या व्यवसायात रुळलेल्या महिला असा प्रकार करतात.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना माहिती मिळाली की, रोशनी बबलू शेख ( ४० ) रा . सांताक्रूझ हि महिला स्वतःला गायिका सांगते व ती हिंदी कव्वाली मध्ये काम करणाऱ्या गायिका तरुणींना वेश्या व्यवसाय साठी पुरवते. सांताक्रुझ, अंधेरी, दहिसर, बोरीवली, काशिमीरा या परिसरातील लॉजमध्ये रुम बुक करावयास लावून किंवा गिन्हाईकाचे सोयीनुसार एका मुलीचा वेश्यागमनाचा मोबदला व तिचे कमीशन असे मिळून २० हजार रुपये घेते .

पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक मार्फत तिच्याशी संपर्क केला असता तिने सांगितल्याप्रमाणे दारास ढाबा, मुंबई – अहमदाबाद महामार्ग येथे येण्यास सांगितले . पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहायक उपनिरीक्षक उमेश पाटील सह शिवाजी पाटील, केशव शिंदे, चेतनसिंग राजपुत, सम्राट गावडे, शितल जाधव, पुजा हंडे यांनी सोमवारी सायंकाळी दारास ढाबा येथे सापळा रचला. तिने बोगस गिऱ्हाईक कडून रक्कम स्वीकारत एक तरुणीस वेश्यागमनासाठी दिले. पोलिसांनी खात्री पटताच छापा टाकून तिला ताब्यात घेतले व पीडित तरुणीची सुटका केली. पिटा कायद्या नुसार रोशनी हिच्यावर मंगळवारी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close