सामाजिक

पांढरी खानमपुर येथे गावकऱ्यांनी केला चक्काजाम.

Spread the love

अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे

पांढरी खानमपुर गावातील सामाजिक वातावरण धगधगत असून येथील प्रवेशद्वाराचा प्रश्न कालच्या आंबेडकरी अनुयायांच्या गाव सोडल्याने संपुर्ण महाराष्ट्रात गाजत असतांना लगेच गावात क्रीयेवर प्रतीक्रीया उमटल्या असुन आज दि,७ ला दुसरीकडे पांढरी येथील दुसऱ्या पक्षाने आमच्यावर अन्याय होत असल्याचे म्हणत आम्हाला न्याय मिळवुन देण्यासाठी शेकडो महीला पुरुषांनी काही वेळासाठी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या दिल्याने लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पांढरी खानमपुर येथील प्रवेशद्वाराचा प्रश्न संपुर्ण जिल्ह्यात गाजत असतांना काल दि.६ कलम १४४ लागु असतांना आंबेडकरी अनुयायांनी आमचे कुणी वाली नाही म्हणत गाव सोडले.हा प्रश्न संपुर्ण महाराष्ट्रात गाजत असतांनाआज दि.७ ला दुसऱ्या पक्षाने प्रशासन एका गटाला झुकते माप देत आहे व ते आमच्यावर अन्याय करत असल्याचे म्हणत चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला,कलम १४४ चे उल्लंघन करणाऱ्यांनवर प्रशासनाने गुन्हे का दाखल केले नाही,असे म्हणत आज सायंकाळी सहा साडेसहा वाजताच्या दरम्यान महीला व पुरुष राष्ट्रीय महामार्गावर गोळा होऊन काही वेळासाठी संपुर्णरास्ट्रीय महामार्गावरिल वाहने अडून काही वेळासाठी चक्काजाम केला होता. परंतू पोलीस प्रशासनाच्या शिष्टाईने महामार्ग पुन्हा सुरु करण्यात आला,यावेळी शेकडो पोलीसांचा ताफा पांढरी येथे बंदोबस्तासाठी उपलब्ध होता.एकंदरित हा प्रश्न सुटत नसल्याने व दरोरोज नवीन नवीन प्रश्न उपस्थित होत असताना सदर प्रवेशद्वाराचा मुद्दा प्रशासनाच्या गळ्यातील काटा बनला असुन लवकरात लवकर प्रश्न निकाली निघावा अशी मागणी पांढरी येथील नागरिकांमध्ये होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close