गव्हाणकुंड शेत शिवारात रान डुकरांचा हौदोस, वनविभागाचे मात्र दुर्लक्ष.
वरूड/तूषार अकर्ते
वरुड येथून काही अंतरावर असलेल्या गव्हाणकुंड शेत शिवारामध्ये रान डुकरांचा हौदोस मागील आठ दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आतापर्यंत रानडुक्करांनी जवळपास ३० ते ४० हेक्टर वरील शेतक-यांची पिके नष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची पुर्णपने नासाडी केली आहे. तर रात्रीचा वेळेस वाहनाला आडवे होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण करताना दिसुन येत आहे.तरी सुद्धा वन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. वनविभागाकडुन अशा प्राण्यांना जेरबंद करून नागरिकांना सुटकेचा श्वास द्यावा अशी मागणी येथील परिसरातील नागरिकांकडुन केली जात आहे.
शेतक-यांच्या शेतीमालाची नासाडी झाल्यानंतर वनविभागाचा एकही कर्मचारी पहाणी करण्याकरिता येत नाही ही शोकांतिका आहे. जेमतेम शेतकऱ्यांचे पीक निघायला सुरवात झाली आहे. थोडे पीक मोठे झाले असता रानडुक्करे ही पीके पूर्ण पणे उधवस्त करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी करावे तरी काय असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. या कडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देवुन तात्काळ उपाय योजना करने अपेक्षित आहे.अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.